Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे 'जिन्स', पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ
esakal November 18, 2024 01:45 PM

कोल्हापूर : ‘‘काँग्रेसचे ‘जिन्स’ हे इंग्रजांचे आहेत. त्यामुळेच ते देशात जात, प्रांत, भाषा या मुद्यांवर फूट पाडत आहेत. आपल्यात फूट पडली की देशाचे विभाजन होते. अयोध्येतील रामाची विटंबना होते, मथुरेत कृष्णाचा अपमान होतो, विशाळगडावर अतिक्रमण होते. हा इतिहास आहे,’’ असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे केला. हे थांबवायचे असले तर, आपण एक होऊन राज्यात महायुतीला सत्तेत आणले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आदित्यनाथ यांची येथील तपोवन मैदानावर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने आदींसह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कारण काँग्रेसकडून देशात फूट पाडण्याचा डाव सुरू आहे. त्यांच्यात इंग्रजांचे ‘जिन्स’ आहेत. फूट पाडण्याची सुरुवात १९४७ पासून झाली. काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वाने ठरवले असते, तर देशाची फाळणी झाली नसती; मात्र सत्तालालसा आणि कमकुवतपणा यामुळे अखंड भारताचे विभाजन झाले.’’

खर्गेंनी सत्य स्वीकारावे!

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘मी ‘बटेंगे तो

कटेंगे’ असे म्हटले की, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना राग येतो; मात्र १९४६ मध्ये त्यांचे बिदरमधील बाराबत्ती हे गाव निजामाच्या रझाकारांनी जाळले. यामध्ये त्यांच्या आई, बहीण आणि काकूंचा मृत्यू झाला. निजामाचे रझाकार कट्टरपंथीय मुस्लिम होते. खर्गे काँग्रेस नेतृत्वाला घाबरतात. त्यामुळे हे वास्तव ते स्वीकारत नाहीत.’’

मोदींमुळे पक्षासह नेत्यांतही बदल : शर्मा

नागपूर

‘हजारो वर्षांच्या गुलामीनंतर आपण स्वातंत्र्य प्राप्त केले आहे. जितके जण स्वातंत्र्य लढा लढत होते, त्यापेक्षा जास्त लोक तमाशे पाहत होते. स्वातंत्र्यानंतर देशातील वातावरण बदलून गेले होते. ते ठीक करण्याठी श्यामाप्रसाद मुखर्जी सारखे लोक झटले होते. देशामध्ये २०१४ नंतर आज मोठे परिवर्तन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय पक्षांसह नेत्यांनाही बदलण्यासाठी भाग पाडले,’’ असे मत राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केले.

...ही तर महाविनाश आघाडी : चौहान

नागपूर

काँग्रेस नेते राहुल गांधी देशात एक आणि विदेशात वेगळे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करतात. राज्यात महाविकास आघाडी नव्हे तर महाविनाश आघाडी तयार झालेली आहे. त्याच्याजवळ विचार, व्यवहार आणि कुठलीही नीती नाही. जाती व धर्मावर केवळ राजकारण करण्याचे काम आघाडी सरकार करत असल्याचा आरोप केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

देशातील योजनांचा

सातारा

लाभ सर्वांसाठी, सुरक्षा सर्वांसाठी देणार मात्र तुष्टीकरण कोणाचेही होणार नाही. हेच उद्दिष्ट

घेऊन राज्यातील महायुतीच्या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे. त्याला सर्वांची साथ

अपेक्षित आहे, त्यामुळे सामान्यांनी नवे राज्य घडविण्याच्या संकल्पात सहभागी व्हावे,

असे आवाहन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. हम बटेंगे तो

कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असे आवाहनही त्यांनी केले.

मसूर

येथे महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत योगी बोलत होते.

योगी म्हणाले, ‘‘राज्यात सध्या निवडणुका सुरू आहेत. त्या केवळ निवडणुका नाहीत हे लक्षात घ्यावे. एकीकडे देश बांधणारी महायुती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले एकजुटीने काम करत आहेत. ती जोडणारी ताकद आहे. त्यांना विकासाचे व्हीजन आहे. दुसरीकडे कॉँग्रेस व त्यांची महाआघाडी फोडण्याचे काम करत आहे.’’

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.