तारुण्यातील या 5 आर्थिक चुका, ज्यामुळे भविष्यात होईल मोठे नुकसान; श्रीमंत होण्यास ठरतात अडसर
मुंबई : एखाद्याने योग्य वयात सुरू केलेली बचत आणि गुंतवणुकीचा विचार करून केलेले योग्य आर्थिक नियोजन त्याला नक्कीच श्रीमंतीच्या मार्गावर आणून सोडते. परंतू कमाई सुरू झाल्या झाल्या तरुण वयात काही लोक चुकीच्या सवयींमुळे आपला बराचसा पैसा विनाकारण वाया घालवतात आणि नंतर पश्चाताप करतात. परंतू हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. जाणून घ्या अशाच 5 सवयींबद्दल ज्यामुळे तुमचे आर्थिक भविष्य धोक्यात येऊ शकते. श्रीमंत असल्याचे ढोंग करणेश्रीमंत असल्याचे भासवण्याची सवय तरुण पिढीमध्ये सर्रास आहे. श्रीमंत असणे आणि इतरांना श्रीमंत दिसणे यात खूप फरक आहे. आजकाल, स्वत:ला श्रीमंत दाखवण्यासाठी, लोक महागड्या दारू, पार्ट्या, धूम्रपान, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाणे, ऑनलाइन गेम, डिस्क, ब्रँडेड शॉपिंग इत्यादींवर खूप पैसा खर्च करतात, जे ते सहजपणे वाचवू शकत असतात. हा पैसा त्यांनी वाचवला आणि योग्य ठिकाणी गुंतवला तर येत्या काही वर्षांत ते खरोखरच श्रीमंत होतील. कुणालाही श्रीमंत असल्याचा आव आणण्याची गरज उरणार नाही. छंद जोपासण्यासाठी कर्ज घेणेआजच्या काळात तुम्हाला बँकांमध्ये कर्जाची सुविधा मिळते, पण ती तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घेतली जाऊ शकते, तुमचे छंद पूर्ण करण्यासाठी नाही. जर तुम्ही घरासाठी, शिक्षणासाठी, तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घेत असाल तर ही तुमची गरज आहे, परंतु तुम्ही छंदात्मक खरेदीसाठी, प्रवासासाठी, महागडा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी कर्ज घेत असाल तर हा अनावश्यक खर्च आहे. हा खर्च थांबवा. क्रेडिट कार्डने लोकांना अनेक सुविधा दिल्या आहेत आणि कर्जाची सवयही वाढवली आहे. त्यामुळे अनेक वेळा खर्च आवश्यकतेपेक्षा जास्त होऊन उत्पन्न हे कर्ज फेडण्याच्या दिशेने जाते. या सवयीवर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करणे कठीण होईल. बचत न करणेपैसा हातात येण्याआधीच तो कुठे खर्च करायचा याचे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतू अनेकदा नोकरी लागल्यानंतर हाती असलेल्या मोजक्या पैशांचीही उधळपट्टी करण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा परिस्थितीत त्यांच्या पैशाची बचत होत नाही. लक्षात ठेवा की पैसे वाया घालवण्याची ही सवय सहजासहजी बदलता येणार नाही आणि नंतर तुम्हाला बचत करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे श्रीमंत व्हायचे असेल तर पहिल्या पगारापासून बचत करण्याची सवय अंगी बाळगायला हवी. आदर्श परिस्थितीत तुमच्या पगारातील 20 टक्के बचत करणे योग्य ठरते. गुंतवणूक न करणेबरेच लोक पैशांची बचत करतात परंतू ते खात्यात पडून राहतात आणि नंतर अचानक ते कुठेतरी खर्च होतात आणि ते पुन्हा रिकामे होतात. त्यामुळे तुमची बचत गुंतवण्याची सवय लावा. गुंतवलेले पैसे तुम्हाला भविष्यात खूप मदत करतात. आजकाल, गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे चक्रवाढीचा लाभ देतात आणि पैशाचे वेगाने संपत्तीमध्ये रूपांतर करतात. जर तुम्ही योग्य रणनीतीने कुठेतरी गुंतवणूक केली तर लक्षाधीश होणे ही काही मोठी गोष्ट नाही. याशिवाय तुमची गुंतवणूक छोटी असो वा मोठी, या फंदात पडू नका. फक्त गुंतवणुकीची सवय लावा कारण छोट्या गुंतवणुकीतूनही मोठा निधी निर्माण होऊ शकतो. आरोग्य विमा खरेदी न करणेआजही भारतातील लोकांचा एक मोठा वर्ग आरोग्य विमा आवश्यक मानत नाही. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर ही चूक सुधारा आणि कोणत्याही परिस्थितीत आरोग्य विमा योजना खरेदी करा. आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती कोणालाही कधीही येऊ शकते. अशा परिस्थितीत, बचतीचे बरेच पैसे अचानक खर्च होतात आणि नंतर आपल्याला पश्चात्ताप होत राहतो. तुम्ही आगाऊ आरोग्य विमा खरेदी केल्यास, ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षा कवच देईल आणि कठीण काळात तुमचे जीवन वाचविण्यात मदत करेल. त्यामुळे तुमचे पैसेही वाचतील. तुम्ही आरोग्य विमा योजना जितक्या कमी वयात खरेदी कराल तितके त्याचे प्रीमियम कमी असतात.