Kashmira Shah Accident: कॉमेडियन कृष्णा अभिषेक याची पत्नी अभिनेत्री कश्मिरा शहा हिचा अपघात झाल्याचं तीन तिच्या सोशल मीडियावरून शेअर केलं . रक्ताळलेल्या कपड्यांचा कारमधील फोटो शेअर करत तिने देवाचे आभार मानणारी एक पोस्ट केली आहे . यात काहीतरी मोठं झालं असतं . पण थोडक्यात निभावलं अशा आशयाची माहिती देत घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचेही पोस्टमधून तिच्या चाहत्यांना आणि जवळच्या व्यक्तींना कळवलं . तिच्या या पोस्टवर चहात्यांनी तिची तब्येत ठीक असल्याचं तिला विचारलं . अनेकांनी हा अपघात भयानक दिसतोय अशा प्रकारच्या कमेंट्स तिच्या पोस्टवर केल्यात .
कश्मीरा शहाने तिच्या instagram वरून सोमवारी सकाळी रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत आपला अपघात झाल्याची माहिती दिली . खरोखरच एक भयानक अपघात होता असं सांगत काहीतरी मोठं घडलं असतं पण थोडक्यात निभावलं .असं लिहीत तिने या अपघातातून वाचल्याबद्दल देवाचा आभार मानले . या पोस्टमध्ये तिच्या चाहत्यांना ती सुखरूप असल्याचेही सांगितलं .तिने या पोस्टच्या कॅप्शन मध्ये असे लिहिले ,मी देवाचा आभार मानते की मी अपघातातून वाचले . तू खरोखर एक भयानक अपघात होता .काहीतरी मोठं घडणार होतं . पण थोडक्यात निभावलं .मी आशा करते आता काहीही भीतीदायक घडणार नाही . प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण त्यावेळी जगा . खरंच आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे . घरी परत येण्यासाठी आता धीर धरवत नाही . असं तिनं या कॅप्शनमध्ये लिहिलंय .
कश्मिरा शहा हिने केलेल्या अपघाताच्या या पोस्टवरती तिच्या जवळच्या नातेवाईकांसह चाहत्यांनीही देवाचे आभार मानल्याचे दिसले .अनेकांनी तिला तू ठीक आहेस का ? हा अपघात खूप भीतीदायक वाटतोय ..अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत . अपघाताला ही ज्या सकारात्मकतेने ती सामोरे गेली याचाही चहा त्यांना अप्रूप वाटतंय .
View this post on Instagram
कश्मिरा शहा ही नुकतेच लाफ्टर शेफ शो मध्ये दिसली होती . या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती कृष्णा अभिषेकही होता . कश्मीरा आणि कृष्णा लाफ्टर शेफ शोच्या त्या एपिसोडमध्ये खूप मस्ती करताना प्रेक्षकांना दिसले . त्यांच्या नात्यातली बॉण्डींगही चाहत्यांना खूप भावली होती . कश्मीरा शहा आणि कृष्णा अभिषेक हे दोघेही आपल्या मुलांसोबत मजेशीर पद्धतीने वेळ घालवताना कायम दिसतात . त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरही ते सक्रिय आहेत .