हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन !
GH News November 18, 2024 07:15 PM

तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. परंतू अलिकडे झालेल्या एका संशोधनात ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी केवळ 5 मिनिटांचा एक्स्ट्रा एक्सरसाईज खूपच फायदेशीर होऊ शकतो.हे संशोधन ब्रिटीश हॉर्ट फाऊंडेशनने केलेले आहे. नव्या संशोधनानुसार खूप जास्त व्यायाम करण्याची आवश्यकता नसते. रेग्युलर आणि थोड्या काळाचा व्यायाम देखील ब्लडप्रेशर कमी करण्यासाठी मोलाची मदत करु शकतो. कसा ते पाहूयात….

15,000 हजार लोकांवर झाला अभ्यास

लंडन आणि सिडनी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक संशोधन केले आहे. त्यात आढळले की दररोज केवळ पाच मिनिटांचा एक्स्ट्रा एक्सरसाईज देखील ब्लड प्रेशरला कमी करु शकतो. या प्रयोगात 15,000 लोकांना रोज 24 तास निरीक्षणाखाली ठेवले. नंतर आढळले की जसे सायकल चालवणे, जिने चढणे सारख्या छोट्या-छोट्या एक्सरसाईजना डेली रुटीनमध्ये सामील केल्याने ब्लड प्रेशरच्या पातळीत चांगली सुधारणा होते.

5 मिनिटांच्या व्यायामाची जादू

या संशोधनात आढळले की रेग्युलर एक्सरसाईज, मग थोड्या – थोड्या वेळाने केला तरी हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी चांगले प्रभावी ठरु शकते. हे त्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार ज्यांना व्यस्त जीवनशैलीमुळे नियमित व्यायाम करता येत नाही. संशोधकांच्या मते दिवसात केवळ 5 मिनिटे एक्स्ट्रा एक्सरसाईज केल्याने देखील ब्लड प्रेशर कंट्रोल करणे आणि एकूणच आरोग्यात सुधारणा करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते. छोटे-छोटे बदल करुन आपण आपल्या आरोग्याला अधिक चांगले बनवू शकतो. आणि ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवू शकतो.

उच्च रक्तदाबाशी लढण्याचा परिमाणकारक उपाय काय?

संशोधनात हे उघड झाले आहे की हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी तुम्हाला जिमला जाणे किंवा जास्त वर्कआऊट करण्याची गरज नाही. रोजच्या जीवनात छोटे-छोटे बदल करुन सायकल चालविणे, जिने चढणे किंवा वेगाने चालणे देखील फायदेशीर होऊ शकते. अनेक संशोधनात स्पष्ट झाले आहे की रेग्युलर फिजिकल एक्टीविटी हळू-हळू ब्लड प्रेशरला कंट्रोल करण्यास आपल्याला मदत करु शकते. आपल्या डेली रुटीनमध्ये थोडी-थोडी फिजिकल एक्टीविटी सामील करुन आपल्या चांगल्या आरोग्याचा मार्ग मोकळा करु शकता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.