पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाला 6 महिने पूर्ण झाले. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. सुषमा अंधारे यांनी या मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. 6 महिने झाल्यामुळे आज त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि या प्रकरणात अग्रवाल कुटुंबियांवर आणि त्यांना मदत केलेले विद्यमान आमदार सुनिल टिंगरेंवर चांगलाच हल्लाबोल केला. पोर्श हिट अँड रन प्रकरणात गुन्हेगारांना वाचविणारे गुन्हेगार कोण टिंगरे साहेब?, असादेखील प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
लोकप्रतिनिधी म्हणून अपघात स्थळी जाणे, निष्पाप बळी पडलेल्या युवांच्या कुटुंबियांना भेटणं गरजेचे होते, की पोलीस स्टेशन, ससून आणी एकसाईज च्या कार्यालयाना जाणे महत्वाचे होते? या प्रकरणात राजकीय दबाव आणून गुन्हेगारांना वाचविणारेच खरे गुन्हेगार नाहीत का ? अशा अनेक बोचऱ्या प्रश्नांची सरबत्तीच उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज केली.पोर्शमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या बाळासोबत अन्य अल्पवयीन मुले कोण होती. त्यात कोणा नेत्याचा मुलगा होता का,हे टिंगरे यांनी सांगावे, असे आव्हानही अंधारे यांनी दिले.
मी, सुप्रिया सुळे, आमचे पक्ष कोणीही या नोटीशींना घाबरत नाही, कायदेशीर कारवाई करायची असेल तर करा,असे आव्हानही त्यांनी दिले.वडगाव शेरी मधील एक नागरिक म्हणून या प्रकरणावर मी बोलत आहे, असेही त्यांनी सागितले. या प्रकरणात विविध वृत्तपत्रात पोलखोल करणाऱ्या आलेल्या बातम्यांची कात्रणेही त्यांनी पुष्टीसाठी वाचून दाखवली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, तुम्ही पिझ्झा बर्गर घेऊन एका आरोपीसाठी गेला होता, गोरगरिबांचे काम करणे ही लोकप्रतिनिधीचे काम आहेत एका आरोपीसाठी पिझ्झा बर्गर घेऊन जाणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहेत याचा विचार तुम्ही करावा. रक्ताचे नमुने बदललेल्या आरोपीला मिळालेल्या रकमेची चौकशी पोलीस करणार होते मात्र ती चौकशी का थांबली? या तपासाची परवानगी पोलीस आयुक्तांनी मागितली होती मात्र ही चौकशी का थांबली ग्रह खात्यात सोबत सत्तेत असणारी पार्टनरशिप हे काय वेगळं सांगायची गरज नाही.पोर्षे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत आणखीन एक मुलगा होता तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजून झाला नाही. पोर्शे कार अपघात प्रकरणात तुमचा सहभाग होता हे तुम्ही अमान्य करू शकाल का?हे प्रकरण चालू असताना तुम्ही कुठे गायब होतात पोलीस आणि माध्यमांच्या समोर तुम्ही का आला नाही? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कोणी दबाव केला? तुम्हाला उमेदवारी देताना हाच मुद्दा अडचणीचा होता ही महायुतीतील चर्चा आमच्यापर्यंत पोहोचले आहे.