आरक्षणाची मर्यादा हटवायची आहे. २५ लाख युवकांना रोजगार देणार, असे सांगत काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. 'एक है तौ सेफ है' या नरेंद्र मोदी यांच्या नाऱ्याची त्यांनी तिजोरी दाखवत खिल्ली उडवली. तिजोरीतून त्यांनी मोदी-अदानी, धारावी झोपडपट्टी पूनवर्सन प्रकल्पांचे फोटो काढले.
Manoj Jarange Patil News: जरांगे फॅक्टर निर्णायक ठरणारलोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात ज्याप्रमाणे मनोज जरांगे फॅक्टर हा महत्वाचा ठरला होता, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे फॅक्टर निकालासाठी निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. यांचा प्रत्यय रविवारी रात्री नांदेडमध्ये आला. मराठा आरक्षणासाठी योगदान नसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी भाजप आमदाराची सभा उधळून लावली. नायगाव मतदारसंघातील भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या प्रचारार्थ सभा होती, सभेला आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पुनम पवार उपस्थित होत्या. आमदार राजेश पवार सभेकडे रवाना होत असतानाच गावकऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत सभेला विरोध केला. त्यामुळे ही सभा झाली नाही.
firing news.jpg Jalgaon VidhanSabhaElection News: अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबारकोल्हापूरजवळ रविवारी रात्री जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावरही अज्ञात हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला असल्याची घटना ताजी असतानाच जळगावातही असाच प्रकार झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी अहमद हुसेन शेख यांच्या घरावर केलेल्या गोळीबारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगावातील मेहरूण परिसरात हा प्रकार घडला आहे.
Uddhav Thackeray Shiv Sena Uddhav thackeray Party Teaser : ठाकरेंचा टिझर ; महायुतीला धडकी भरवणार ? 'महाराष्ट्रीयन की महायुतीये'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'महाराष्ट्रीयन की महायुतीये' या शब्दात टिझरमध्ये प्रश्न विचारण्यातच आले आहेत. ठाकरे गटाने टिझरमध्ये महायुतीचा उल्लेख 'महायुतीये'असा केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दुसरीकडे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या तुळजापूर येथे दौरा आहे. ते आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची सुरुवात केली होती आता प्रचार संपल्यानंतर उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत.
Sharad Pawar, Ajit Pawar Ajit Pawar Vs Yugendra Pawar Baramati Assembly Election :'काका-पुतण्या' च्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष ; सभा गाजणार...विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाकडे राज्याचे लागले आहे. प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी बारामती 'काका-पुतण्या'ची सभा होत आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्य अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शड्डू ठोकला आहे. ही लढत सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारांची सांगती आज दुपारी बारामतीत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा होत आहे. तर अजित पवार यांचीही देखील आज बारामतीत सभा आहेत. दोन्ही पवारांच्या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
Jansuraj Party candidate Santaji Ghorpade Attack News: जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्लाकोल्हापुरमध्ये सात-ते आठ जणांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला केला. घोरपडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना करवीर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. करवीर मतदार संघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार व्हिजन चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. रविवारी प्रचार संपून ते घरी जात असताना रात्री 11:00 च्या दरम्यान त्यांच्यावर मानवाड जवळ हा हल्ल्या करण्यात आला. आल्यानंतर अज्ञात व्यक्ती अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार झाले.
Vidhan Sabha Nivadnuk : छुप्या प्रचाराला सुरुवात होणारराज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता होत आहे. येत्या बुधवारी (ता. 20) मतदान आहे. आज ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राज्यात विविध ठिकाणी सभा होत आहे. आज सांयकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु आहे. आज अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचार सांगता सभा देखील होणार आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.