रोज एक अंड खाल्ल्याचा आहे चत्मकारीक फायदा, संशोधनातून समोर आली मोठी गोष्ट
GH News November 19, 2024 12:10 AM

संशोधनातून एक नवीन माहिती समोर आली आहे. वाढत्या वयाबरोबर तुम्हाला जर तुमची स्मरणशक्ती तेज ठेवायची असेल तर रोज एक अंडे खाल्ले पाहिजे. अंडे खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिएगोच्या टीमने हे संशोधन केलं आहे. त्यांच्या संशोधनानुसार, अंड्यात डाएटरी कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे मेंदूच्या कार्याला अत्यंत चांगलं बनवण्यासाठी त्यातून पोषक तत्त्व मिळतात.

या वयाच्या लोकांची टेस्टिंग

हे संशोधन करण्यासाठी 55 वर्षाहून अधिक वयाच्या लोकांची टेस्टिंग करण्यात आली. एकूण 890 व्यक्तींचा ( 357 पुरुष आणि 533 महिला) यात समावेश होता. अंड्याचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर काय परिणाम होतो हे या लोकांवर संशोधन करून पाहिलं गेलं. न्यूट्रिएंट्स पत्रिकेत हे संशोधन छापून आलं आहे. ज्या महिलांनी अधिक अंडी खाल्ली त्यांच्यात चार वर्षात व्हर्बल फ्लूएन्सी (शब्द वेगाने आणि तंतोतंत बोलण्याची क्षमता) कमी होण्याचं प्रमाण इतर महिलांच्या तुलनेत कमी होतं.

तसेच अंडी खाणाऱ्या महिलांची जनावरे आणि झाडांची नावे स्मरणात ठेवण्याची क्षमताही वाढल्याचं आढळून आलं. विशेष म्हणजे ज्या महिलांनी एकही अंडे खाल्ले नव्हते त्यांची नावे लक्षात ठेवण्याची क्षमता तुलनेने कमी असल्याचं दिसून आलं. लाइफस्टाईल आणि आरोग्याशी संबंधित गोष्टी लक्षात ठेवून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

 अंड्यांमधील पोषण

अंड्यात कोलीन असतो, जो मेंदूच्या कार्यक्षमतेला उत्तेजित करण्यास आणि स्मरणशक्तीला सुधारण्यास मदत करतो. कोलीन मेंदूच्या पेशींमधील संप्रेषण (Communication) सुधारण्यासही सहाय्यक ठरतो. याव्यतिरिक्त, अंड्यात बी-6, बी-12 आणि फोलिक ऍसिडसारखे महत्वाचे व्हिटॅमिन्स देखील असतात, जे मेंदूच्या आकार कमी होण्याची प्रक्रिया (Brain Shrinkage) थांबवू शकतात आणि स्मरणशक्तीला सुधारण्यास मदत करतात.

अंड्यांच्या सेवनावर करण्यात आलेले अध्ययन एका अध्ययनात पुरुषांवर अंड्याच्या सेवनाचा काही विशेष प्रभाव दिसून आलेला नाही, परंतु सर्वसाधारणपणे दोन्ही लिंगांमध्ये अंड्याच्या सेवनाचे कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले नाहीत. संशोधकांच्या मते, हे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत कारण वयाच्या वाढीसोबत स्मरणशक्तीशी संबंधित समस्या एक मोठा चिंतेचा विषय बनू शकतात.

यूसी सॅन डिएगोच्या प्रोफेसरचे मत

यूसी सॅन डिएगोच्या प्रोफेसर डोना क्रिट्ज-सिल्वरस्टीन यांनी सांगितले की, या संशोधनामुळे हे स्पष्ट झाले की, महिलांसाठी अंड्याचे सेवन एक स्वस्त आणि सोपा उपाय ठरू शकतो, ज्यामुळे त्यांचे कॉग्निटिव्ह हेल्थ (Cognitive Health) सुधारू शकते.

पूर्वीच्या संशोधनांचे महत्त्व

पूर्वी केलेल्या अनेक संशोधनांमध्ये हे देखील दिसून आले की, अंडे महिलांना ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांच्या समस्या टाळण्यास मदत करतात. अंड्यात उच्च दर्जाचे प्रोटीन, व्हिटॅमिन बी12, फॉस्फरस आणि सेलेनियम असतो. अंड्यातील व्हिटॅमिन ए, बी12 आणि सेलेनियम शरीराच्या इम्यून सिस्टम (Immune System)ला बळकट करण्यात मदत करतात. अंड्याचे नियमित सेवन महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.