Amravati Crime : धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रतापदादा अडसड यांच्या भगिनी अर्चनाताई रोटे (अडसड) यांच्यावर सातेफळ जवळ चाकू हल्ला करण्यात आलाय. प्रताप अडसड यांच्या सर्व प्रचाराची धुरा त्यांच्या बहिणीकडे आहे. सकाळ पासून सायंकाळ पर्यंत त्या गावा गावात जाऊन प्रचार करत आहेत. मात्र, आज रात्री सातेफळ फाट्याजवळ 7 ते 8 जण अज्ञातांनी त्यांच्यावर चालूने हल्ला केलाय.
छत्रपती संभाजी नगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात उभा असलेल्या अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर हल्ला झालाय. अपक्ष उमेदवाराच्या कारवर दगडफेक दगडफेक करण्यात आलीये. सुरेश सोनवणे असं हल्ला झालेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. गळणीम रोडवर सोनवणे यांची गाडी अडवत 10 ते 15 लोकांच्या जमावाने दगडफेक केल्या प्रकार समोर आलाय. दरम्यान, यामध्ये उमेदवार सोनवणे यांच्यासह तीन ते चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाळूज टोल नाक्याजवळील जवळील सी एस एम एस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
अनिल देशमुख जी ह्यांच्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 18, 2024
महाराष्ट्रात सत्ताबदल होणं अटळ असल्याने हादरलेल्या महाराष्ट्रद्रोही समाजकंटकांकडून असे भ्याड हल्ले सुरु झालेले दिसतात.
या अगोदर काही वेळापूर्वीच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. देशमुख काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवल अज्ञात व्यक्तीने हा केला असल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांकडून करण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलाय. यानंतर अनिल देशमुख यांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरसाठी रेफर करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांना घेऊन त्यांचे सहकारी काटोल वरून नागपूरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर दगडफेक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला… pic.twitter.com/6oLoFyEoAy
— Supriya Sule (@supriya_sule) November 18, 2024