Dilip Joshi On Fighting Rumors With Asit Modi: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतीच मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि आसितकुमार मोदी यांच्यात जोरदार वाद झाल्याची बातमी समोर आली होती. पण यावर आता दिलीप जोशी यांची प्रतिक्रिया देखील समोर आलीये. त्यामुळे या वादाचं नेमकं सत्यता काय याची पडताळणी झाली आहे.
दिलीप जोशी यांनी असित कुमार मोदींसोबतच्या भांडणाच्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांन म्हटलं की, माझ्या आणि असितजींबद्दल काही बातम्या समोर येत आहेत. या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. अशा गोष्टी बोलल्या जात आहेत, हेच पाहून मला खूप वाईट वाटतंय.
दिलीप जोशी यांनी म्हटलं की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका माझ्यासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. जेव्हा लोक बिनबुडाच्या अफवा पसरवतात तेव्हा ते केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या दर्शकांनाही त्रास देतात. इतक्या वर्षात इतक्या लोकांना खूप आनंद देणाऱ्या एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मकता पसरत आहे, हे पाहून वाईट वाटतंय. याआधी माझ्या शो सोडल्याच्या अफवा पसरल्या होत्या, त्या पूर्णपणे खोट्या आहेत आणि आता दर काही आठवड्यांनी आसित मोदी आणि मालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पाहायला मिळतंय.
रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये गोलीची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. दिलीप असितकुमार मोदींची वाट पाहत होते. मात्र निर्माते आल्यावर त्यांची भेट झाली नाही. असित मोदी थेट कुशला भेटायला गेले आणि दिलीप जोशी यांना राग आला. दिलीप जोशी संतापले आणि त्यांनी असित मोदींशी वाद घातला असल्याचं सांगण्यात आलं होतं.
दिलीप कुमार आणि असित मोदी यांच्यातील वाद इतका वाढला की अभिनेत्याने निर्मात्याची कॉलरही पकडली असल्याचं म्हटलं जात होतं. यादरम्यान दिलीप जोशी यांनी शो सोडण्याचीही धमकी दिल्याची बातमी समोर आली होती. मात्र नंतर असित मोदी यांनी त्यांना समजावून सांगितलं असल्याचं म्हटलं जात होतं.