Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...
Saam TV November 18, 2024 10:45 PM

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र आणि मतदारसंघ कार्यालयामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मतदान केंद्रावर साहित्य वेळेत पोहोचावे यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीत बदल केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता बोरिवली पूर्व येथे रस्ते असणार आहे. १९ नोव्हेंबरला १२ ते २४ नोव्हेंबरला ८ वाजेपर्यंत अप्पासाहेब सिधिये मार्ग, श्रीकृष्णनगर पुलापासून अभिनवनगर गेट क्रमांक ५ पर्यंत, बोरिवली पूर्व येथे वाहने उभी करण्यास मनाई आहे. तर सर्व प्रकारच्या वाहनांना २३ नोव्हेंबरला ५ ते २४ पर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसच्या जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी बेस्ट उपक्रमाला मतदानाच्या दिवशी जादा बस फेऱ्या चालविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बसही उपलब्ध असणार आहे.

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग, वयवर्षे ८५ पेक्षा अधिक ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचता यावे यासाठी उपक्रमाची बस सेवा सज्ज असणार आहे. या सेवेसाठी मतदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच ही सेवा मुंबई शहरांसह दोन्ही उपनगरांत उपलब्ध असणार आहे.

१७ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते २४ नोव्हेंबर रोजी ८ वाजेपर्यंत एफसीआय, राजेंद्र नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई येथे मुख्य गेटपासुन दोनशे मीटर अंतरापर्यतचे रोडवर निवडणूक कामकाजा व्यतिरीक्त इतर सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नो पार्किंग (निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात वाहने वगळून)- १) स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान ते नेहरुनगर एस.टी डेपो शिवसृष्टी रोड पर्यंत कुर्ला (पूर्व) मुंबई २) कुर्ला कामगार नगर म.न.पा शाळा समोरील रोड, कुर्ला (पूर्व) हाआदेश. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५९ वा पर्यंत लागू राहणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.