RAT18P21.JPG, RAT18P22.JPG-
26068, 26069
चिपळूण ः बहादूरशेख नाका येथे जलवाहिनी फुटल्याने वाया जाणारे पाणी.
---------
बहादूरशेख नाका परिसरात
मुख्य वाहिनीला गळती
हजारो लिटर पाणी वाया ; चिखलाचे साम्राज्य, दुरुस्तीकडे दुर्लक्ष
चिपळूण, ता. १८ ः शहरातील बहादूरशेखनाका परिसरात गेल्या महिनाभरापासून मुख्य पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गुहागर-विजापूर मार्गासाठी कटाई करावी लागणार असल्याने हे काम रखडले आहे. यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
अर्ध्या शहराला खेर्डी-माळेवाडी येथे असलेल्या जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. येथे कायम पाणी असल्याने ही जॅकवेल अर्ध्या शहरासाठी वरदान आहे; मात्र तेथून शहरात आलेली पाईपलाईन जुनी असल्याने ती सातत्याने फुटत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होतो. बहादूरशेखनाका येथील मच्छीमार्केटजवळ महिनाभरापूर्वी मुख्य पाईपलाईनला गळती लागली; मात्र ही पाईपलाईन खोलवर व विजापूर मार्गाच्याखाली असल्याने हा मुख्य मार्गच कापावा लागणार आहे. त्यामुळे सध्या विधानसभा निवडणुकीची सुरू असलेली धामधूम व मार्गावर वाढलेली वाहतूक याचा विचार करता या कामाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कामाला सुरवात होण्याची शक्यता आहे; मात्र यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने व त्यामुळे परिसरात चिखल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खेर्डी येथील जॅकवेल अर्ध्या शहरासाठी वरदान असल्याने या योजनेच्या पाईपलाईन फुटीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
चौकट
अर्ध्या शहरात पाण्यासाठी ओरड
मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे एकीकडे पाणी वाया जात असताना दुसरीकडे अर्ध्या शहराची तहान भागवणाऱ्या गोवळकोट जॅकवेलकडे वाशिष्ठी नदीचे पाणीच जात नसल्याने ती सुकली आहे. त्यामुळे अर्ध्या शहरात पाण्यासाठी सध्या बोंबाबोंब सुरू आहे.