Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते..
सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने काँग्रेसच्या हाती सत्ता दिली मालेगावमध्ये गरजले एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना सत्तेची एवढी लालूच होती की त्यांनी शिवसेना काँग्रेसला दिली.
सांगलीमध्ये भाजप-आरएसएस बद्दल मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधानमहाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहे. मतदानाच्या अवघ्या तीन दिवस आधी शिवसेनेचे बंडखोर यूबीटी उमेदवार राजा भैय्या पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही- एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरून मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असले तरी आपण या शर्यतीत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
चिराग पासवान यांचा काँग्रेसवर मोठा आरोप, म्हणाले-डॉ.भीमराव आंबेडकरांचा अपमान केला राहुल यांचा 'एक हैं तो सेफ हैं' मोदींच्या या घोषणेवर मोठा हल्ला, धारावी आणि अदानींच्या नावांनी घेरले'माझ्याशी पंगा घेऊ नका...', शरद पवारांचे समर्थकांना आवाहन
महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना बंडखोर म्हणत त्यांचा पराभव करा, असे आवाहन शरद पवार यांनी समर्थकांना केले आहे.
मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होणार, 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहोचणारमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. येथे ते चार वेगवेगळ्या रॅलीत सहभागी होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यांना दिले-राहुल गांधींचा महायुती सरकारवर मोठा आरोप
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मुंबईत केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारवर अनेक मोठे आरोप केले आहे.
महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र निवडणुका होणार असून येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या साठी सर्व पक्षांचे बडे नेते निवडणुकीचे प्रचार करत आहे.
सपाचे उमेदवार अबू आझमी यांनी नवाब मालिकांवर निशाणा साधत म्हणाले. हे आमच्या तुकड्यांवर वाढले आता ते आमच्याशी लढायला आले आहे.धारावीची जमीन आम्ही कोणाला दिली नाही, भाजपचा काँग्रेसवर जोरदार प्रहार
मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बदनामीकारक मोहीम चालवल्याचा आरोप भाजपने केला आहे.
मतदान केंद्रावर मोबाईलवर बंदीचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
येत्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका आहे आणि मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर मोबाईल फोनच्या वापरावर बंदी
जळगावात अपक्ष उमेदवार शेख अहमद यांच्या घरावर गोळीबार
राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला.
राहुल गांधी ज्या पद्धतीने बोलतात, त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही... नितीन गडकरीं यांचा राहुल गांधी यांना टोला
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राहुल गांधी यांना त्यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये.
एनसीपी नेता छगन भुजबल यांचा बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध
महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध केला.
मुंबईसह अनेक शहरांमध्ये चार दिवस ड्राय डे जाहीर
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यात मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये ड्राय डे पाळले जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (EC) सुव्यवस्थित मतदान सुनिश्चित करण्यासाठी हे ड्राय डे अनिवार्य केले आहेत.