एलिफंटा बेटावर बोटीत चढताना चेंगराचेंगरी; अनेक पर्यटक समुद्रात पडता पडता वाचले
Marathi November 19, 2024 06:24 AM

एलिफंटा बेटावर रविवारी बोटीत चढताना प्रचंड गर्दीमुळे तुफान चेंगराचेंगरी झाली. अनेक पर्यटक समुद्रात पडता पडता वाचले. मेरिटाईम बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे तीर्व संताप व्यक्त होत असून या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रविवारी संध्याकाळी 7.10 मिनिटांनी एलिफंटा येथून गेट वे ऑफ इंडियाकडे बोट निघणार होती. या बोटीमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी झाली. या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होत प्रचंड धावपळ उडाली. काही जण तर समुद्रात पडता पडता वाचले.

गर्दीमधील लहान मुले, महिला जिवाच्या आकांताने ओरडत होत्या. मात्र महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा कोणीही अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हता. तसेच गेट वे ऑफ इंडिया येथील जलवाहतूक संस्थेचा जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारीही तिथे आला नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.