अवघ्या 17 मिनिटांत मुंबईहून गाठा थेट नवी मुंबई एअरपोर्ट, नितीन गडकरी स्पष्टच बोलले
Times Now Marathi November 19, 2024 03:45 AM

प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवेमुळे लोकांना आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईतील कोठूनही 17 मिनिटांत पोहोचता येईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी रविवारी रात्री महाराष्ट्राच्या ठाणे शहरात एका निवडणूक सभेला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. मुंबई आणि ठाणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली.

फक्त 17 मिनिटे लागतील20 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च 2025 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. गडकरी म्हणाले की, प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मुंबईच्या कोणत्याही भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी फक्त 17 मिनिटे लागतील.या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी विमानतळाजवळ एक 'जेट्टी' आधीच बांधण्यात आली आहे असेही म्हणाले.



सागरी मार्ग वापरण्याची सूचनामुंबई आणि ठाण्याच्या सभोवतालच्या विशाल सागरी मार्गांचा वापर करून, आम्ही मुंबई आणि पुण्यातील वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. ते पूर्णपणे सुरू झाल्यानंतर बाह्य वाहतुकीचे मार्ग बदलतील आणि महानगरांमधील गर्दी कमी होईल असेही पुढे म्हणाले.

मुंबई-पुणे मार्गावरील निम्मी ट्रॅफिक कमी होणारयेत्या काही वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या रस्त्यावर धावताना दिसणार नाही. तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील. यासाठी इंजिनियर्सचे संशोधन फार महत्त्वाचं आहे. भविष्यात आम्ही नक्कीच अमेरिकेच्याही पुढे जावू असा माझा पूर्ण विश्वास आहे. तसेच मुंबई-पुण्याची ट्रॅफिक 50 टक्क्यांनी कमी होणार असून त्यासाठी प्लॅनही तयार असल्याचे केंद्रीय मंत्री यांनी सांगितले. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, त्यांनी आपल्या आगामी प्रकल्पांबाबत महत्त्वाची माहिती देखील यावेळी दिली.



पुढे बोतलाना, गडकरी म्हणले, अटल सेतू जवळून 14 पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. हा रस्ता मुंबईहून बेंगळुरूला जाणार असून पुण्यातील रिंग रोड मार्गे हा रस्ता तयार केला जाईल. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक 50 टक्क्यांनी कमी होईल. तसेच येत्या 25 वर्षांत सर्व वाहने विजेवर चालतील. आपण रस्ते बांधण्यासाठी कचऱ्याचा वापर करू शकतो, असंही ते म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.