Sushmita Sen Birthday: बॉलिवूडची विश्वसुंदरी असं म्हणल्या म्हणल्या तोंडावर नाव येतं सुष्मिता सेन हिचं! आपल्या अदाकारीनं, आत्मविश्वासानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुष्मिता आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. भारताची पहिली विश्वसुंदरी सुष्मिता स्वातंत्र्य आणि स्वत:ची धमक दाखवत जगण्यासाठी ओळखली जाते. जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातल्या काही इंटरेस्टींग गोष्टी..
वयाच्या १८ व्या वर्षी सुष्मितानं मिस युनिवर्सचा किताब जिंकून इतिहास रचला. भारताकडून जरी सुष्मिता पहिली विश्वसुंदरी ठरली. पण या स्पर्धेसाठी आधी ऐश्वर्या रायला संधी दिली जाणार होती. १९९४ मध्ये झालेल्या मिस युनिवर्स स्पर्धेत पहिल्यांदा भारताची सुष्मिता जाणार होती. पण ऐश्वर्या या स्पर्धेत जाण्याचं कळल्यानंतर अनेक सहभागींसह सुष्मितानंही तिचा या स्पर्धेतला अर्ज मागे घेतला होता. पण, त्याच्या आईने त्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला.
मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी जेव्हा तिला फिलिपाइन्सला जायचे होते तेव्हा तिचा पासपोर्ट हरवला होता, असा खुलासा खुद्द सुष्मितानंच एका मुलाखतीत केला होता. ऐनवेळी झालेल्या गोंधळामुळे भारताच्या या स्पर्धेच्या आयोजकांनी केवळ ऐश्वर्याला मिस युनिवर्समध्ये पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हे ऐकून सुष्मिताही राग आला होता असं ती सांगते. इतक्या कठोर परिश्रमांनंतर आणि प्रामाणिक प्रयत्नांनंतर आता माघार योग्य नसल्याचं तिला वाटलं. आणि वडिलांकडे जाऊन मी या स्पर्धेत जाणार असल्याचं सांगत तिनं विश्वसुंदरी होण्याचा मान पटकावला.सुष्मिताच्या आधी कोणत्याही भारतीय महिलेला ही पदवी मिळाली नव्हती. याआधी ही स्पर्धा ४१ वेळा आयोजित करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे ४२व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ७७ देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता.
जेव्हा आपण सिंगल मदरबद्दल बोलतो तेव्हा त्यात सुष्मिता सेनचा नक्कीच समावेश होतो.सुष्मिता सेनला दोन मुले आहेत, पण तिचे लग्न झालेले नाही. सुष्मिताने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तिची मोठी मुलगी दत्तक घेतली होती. 10 वर्षांनंतर म्हणजेच 2010 मध्ये त्यांनी त्यांची दुसरी मुलगी अलिशा हिला दत्तक घेतले. सुरुवातीच्या काळात सुष्मिताला तिच्या या निर्णयावर तिच्याविषयी खूप चर्चा झाली.