Nayanthara Beyond The Fairy Tale : सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नयनताराच्य़ा आयुष्यावर आधारित 'नयनतारा : बियॉन्ड द फेरीटेल' डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. नयनताराच्या डॉक्युमेंट्रीवर साऊथ अभिनेता धनुषने 10 कोटींची कॉपीराईट केस केली आहे. आता धनुषने नयनताराला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. नयनताराने धनुष विरोधात सोशल मीडियावर ओपन लेटर लिहित निशाणा साधला होता. त्यानंतर आता धनुषच्या लीगल टीमने नयनताराला 24 तासांचा अल्टिमेटम देत नोटीस धाडली आहे.
नयनताराने नुकतीच सोशल मीडियावर एक लांबलचक नोट शेअर केली आणि धनुषविरोधात तिच्या भावना व्यक्त केल्या. या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरण्यात आलेल्या धनुषच्या चित्रपटातील काही सेकंदांच्या गाण्यासाठी नयनताराने 10 कोटी रुपये शुल्क आकारल्याचं सांगितलं होतं. 'नानुम राउडी धान' चित्रपटातील गाण्याचा एक छोटासा भाग 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये वापरण्यात आला आहे, याचे दिग्दर्शन अभिनेत्री नयनताराचा पती विघ्नेश शिवन याने केलं आहे आणि यामध्ये नयनतारा स्वतः मुख्य भूमिकेत आहे. आता नयनताराला धनुषच्या टीमकडून थेट आणि स्पष्ट शब्दात कायदेशीर कारवाई करण्याची सक्त धमकी देण्यात आली आहे.
नयनताराच्या सोशल मीडियावर लिहिलेल्या खुल्या पत्रात नयनतारा : बियॉन्ड द फेयरीटेल या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीवर 10 कोटी रुपयांचा खटला दाखल केल्याबद्दल अभिनेता धनुषवर टीका केली. यानंतर हा वाद आणखी उफाळला आहे. 'नानुम राउडी धान' या चित्रपटातील पडद्यामागील तीन सेकंदांचा व्हिडीओ वापरण्यावरुन ही कॉपीराईटचा हा वाद सुरु झाल्याचं समोर येत आहे. नयनतारा आणि धनुष यांच्यातील वाद आता सर्वांसमोर आला आहे. आता, धनुषच्या वकिलाने नयनताराला अधिकृत नोटीस पाठवत 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
नयनताराच्या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरण्यात आलेल्या धनुषच्या चित्रपटातील काही सेकंदांच्या गाण्यासाठी नयनताराने 10 कोटींची नोटीस पाठवल्याचं सांगितलं होतं. 'नानुम राउडी धान' चित्रपटातील गाण्याचा एक छोटासा भाग 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये वापरण्यात आला आहे, याचे दिग्दर्शन अभिनेत्रीचे पती विघ्नेश शिवन यांनी केले आहे आणि नयनतारा स्वतः मुख्य भूमिकेत आहे.