मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवण्याचा आरोप भाजपवर केलाय. आता यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यात कोणते उद्योग आले, त्यातून किती कोटींची गुंतवणूक आली आणि किती रोजगार मिळणार आहेत याचा लेखाजोखा सादर करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. तसेच थेट परकीय गुंतवणूक आणि देशांतर्गत गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात गेल्या अडीच वर्षांत क्रमांक एकवरच आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडून उद्योग गुजरातला पळाले, सात लाख कोटींची गुंतवणूक तिकडे गेली, असे बेछूट आरोप केले जात आहेत, हे आरोप हास्यास्पद असून हा महाविकास आघाडीचा नवा फेक नरेटीव्ह आहे. थेट परकीय गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे, तर गुजरात सहाव्या-सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी देखील जाहीर केली आहे. ‘मी जी आकडेवारी देतोय, ती वेगवेगळ्या टप्प्यांवर असून गुंतवणूक होणार हे नक्की झालंय. प्रकल्पांची यादी मोठी असून उदाहरणासाठी काहींचा उल्लेख करत आहे. 7 हजार कोटींच्या परकीय गुंतवणुकीतील 52 टक्के फक्त महाराष्ट्रात आली आहे. देशात सर्वात जास्त पायाभूत सेवा प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू आहे’, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच राहुल गांधी यांचे गुंतवणुकीबाबतचे आरोप निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कंपनीचे नाव आणि गुंतवणूक कुठे? गुंतवणूक किती? (कोटी रु.) रोजगार किती?
टॉवर सेमिकंडक्टर, नवी मुंबई, 83947 5000
जिंदाल डिस्प्ले लिमिटेड पुणे 41000 5000
आरआरपी नवी मुंबई 24000 4000
एक रेमंड पुणे 260 185
महिंद्र इलेक्ट्रीक व्हेईकल ऑटोमोबाईल लि. पुणे 10,000 6000
गोगोरो इंडिया प्रा.लि./बडवे इंजिनियरिंग पुणे 20,000 30,000
ए रेमंड चाकण टप्पा २ किंवा तळेगाव 210 130
जेएसडब्ल्यू एमजी ऑरिक सिटी, संभाजीनगर 27200 20000
अथर एनर्जी ऑरिक सिटी, संभाजीनगर 2000 4000
लॉयड्स लॉजिस्टिक प्रा.लि. नागपूर 6000 800
ILP 3 इंडिया 17 प्रा. लि. इंडोस्पेस पुणे 900 2000
जेपीडब्ल्यू वेअरहाऊसिंग प्रा.लि. पुणे 875 4922
ईएसआर ॲडव्हायजर्स इंडिया प्रा.लि. पुणे 800 10,000
जेपीडब्ल्यू वेअरहाऊसिंग प्रा.लि. पुणे 775 3850
जेएसडब्ल्यू एनर्जी रायगड 4200 3200
ग्रीनको एनर्जी प्रोजेक्ट्स, संभाजीनगर 12,000 6300
शक्ती नूतनीकरण नागपूर 20,000 10,000
न्यू एरा क्लीन टेक सोल्यूशन चंद्रपूर 20,000 15,000
आयजेपीएम नवी मुंबई 50,000 100000
आरजीई पेट लि. शहापूर धेरंड 20000 2500
बजाज फिन्सर्व्ह लि. मुंढवा 5000 40,000
आरिया होल्डिंग डब्ल्यूएलएल रायगड 2075 500
निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. पुणे 1650 2000
टोयोटा किर्लोस्कर, छत्रपती संभाजीनगर २१,२७३ ८८००
स्कोडा चाकण 15000 1000
हुंदई मोटार इंडिया लि. तळेगाव (टप्पा 2) 10000 11,000
एलिट प्लस ऑटो सिस्टम्स प्रा. पुणे ४०० २,०००
आणखी वाचा
अधिक पाहा..