पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? तर कोणत्या स्कीमवर किती व्याज? सविस्तर माहिती
Marathi November 19, 2024 03:24 PM

पोस्ट ऑफिस गुंतवणूक: पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. अशा अनेक योजना आहेत ज्यावर बँकेहूनही चांगले व्याज दर मिळत असतात. दरम्यान, बँकांप्रमाणे तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (FD), आरडी (RD) आणि पीपीएफ (PPF) सारख्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवाय अशा काही योजना आहेत ज्यांचा पर्याय तुम्हाला बँकेतही मिळणार नाही. साधारणपणे, सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस योजनांवर उपलब्ध व्याजात सुधारणा करते. त्यानुसार 1 जानेवारीला पुढील व्याजदरात सुधारणा केली जाईल. तर तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्या आधी जाणून घ्या की कोणत्या स्कीमवर किती फायदा होतो.

पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर

पोस्ट ऑफिस बचत खाते – ४%
1 वर्षाची मुदत ठेव- 6.9%
2 वर्षाची मुदत ठेव- 7.0%
३ वर्षाची मुदत ठेव- ७.१%
5 वर्षांची मुदत ठेव- 7.5%
5-वर्ष आवर्ती ठेव खाते- 6.7%
ज्येष्ठ नागरिक बचत योजना – ८.२%
मासिक उत्पन्न योजना- 7.4%
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना- 7.1%
सुकन्या समृद्धी खाते- 8.2%
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे- 7.7%
किसान विकास पत्र – ७.५%
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र- 7.5%

स्मृती इराणीसह पीएम मोदी यांनी केलीय ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक

NSC आणि MSSC दोन्ही मुदत ठेवींप्रमाणे आहेत. कोणताही भारतीय नागरिक NSC मध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओमध्येही या योजनेचा समावेश आहे. तर एमएसएससी महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी चालवली जाते. NSC आणि MSSC दोन्ही मुदत ठेवींप्रमाणे आहेत. कोणताही भारतीय नागरिक NSC मध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओमध्येही या योजनेचा समावेश आहे. तर एमएसएससी महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी चालवली जाते. या योजनेत दोन वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या योजनेत गुंतवणूक केली आहे. POMIS योजना ही दरमहा नियमित उत्पन्न देणारी योजना आहे. या योजनेत, एका खात्यावर जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यावर जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. ही रक्कम ५ वर्षांसाठी ठेवली जाते. यावर 7.4% दराने पैसे दिले जातात. गुंतवणूकदार व्याजाद्वारे कमावतात.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.