Vinod Tawde : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी आज (19 नोव्हेंबर) बहुजन विकास आघाडीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस जनतेला पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. तावडे पाच कोटी घेऊन विरारमधील विवांत हॉटेलमध्ये पोहोचल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. ही बाब बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनीही हॉटेल गाठले. यानंतर हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. सध्या विनोद तावडे हॉटेलमध्येच आहेत. त्याचा बीव्हीए कार्यकर्त्यांसोबत अजूनही वाद सुरू आहे.
विनोद तावडे असलेल्या नालासोपऱ्यातील विवांत हॉटेलमधील केवळ रूम नंबर 407 मध्ये नऊ लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून प्रत्येक रूमची पंचनामा करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. एकूण पाच कोटी रुपये आणले असल्याच्या दावा करण्यात येत आहे. हॉटेलमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी घेरल्याने विनोद तावडे यांना बाहेर पडणे अडचणीच झाले. त्यामुले निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करणे भाग पडले.
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल #maharashtra_election2024 #VinodTawde @BJP4Maharashtra @TawdeVinod @rautsanjay61 https://t.co/xpu7N3BU9R
— ABP माझा (@abpmajhatv) November 19, 2024
दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे आणि नालासोपारा भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. विनोद तावडे यांच्या वाहनाची चौकशी करण्याची मागणी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विरोधक भाजपला कोंडीत पकडण्यात व्यस्त आहेत. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर उद्या मतदान होत आहे.
निवडणूक प्रचार संपल्यानंतर विनोद तावडे तिथे काय करत होते, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. महाराष्ट्रात सरकार फोडण्यासाठी भाजपने आमदारांना विकत घेतले होते, हे सर्वांना माहीत आहे. आता हरण्याच्या भीतीने त्यांना महाराष्ट्रातील जनतेला पैसे वाटून निवडणूक जिंकायची आहे. भाजपची संकल्पना स्पष्ट झाली आहे. निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी.
इतर महत्वाच्या बातम्या