विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप विनोद तावडे यांच्यावर करण्यात येत आहे. तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केलीय. आता त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Assembly Election: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला बविआच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणशिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला बविआच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलीय. या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. सुदेश चौधरी पदाधिकाऱ्याच नाव आहे. विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचं आरोप बहुजनच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या प्लास्टिकच्या पाईपांना आगशहापूर तालुक्यातील आसनगाव येथील जोंधळे मैदानावर ठेवलेले पाणीपुरवठा योजनेच्या प्लास्टिकच्या पाईपांना संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत लाखो रुपयांचे पाईप जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना पैसे वाटावे लागणे दुर्दैवी : अंबादास दानवेभारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीत पैसे वाटावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने पैसे वाटले असते तर ठीक मात्र पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि असे पैसे वाटणे म्हणजे अत्यंत दुर्दैव असल्याची, भावना दानवे यांनी व्यक्त केली.
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्जअनिल देशमुख यांच्यावर सोमवारी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात देशमुख हे जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आला होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
वडाळ्यामध्ये नियोजनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल, ३ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना बुथ वाटप नाहीवडाळ्यामध्ये नियोजनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून येऊन दुपारी ३ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना बुथ वाटप झालेले नाहीये. वाहनं उपलब्ध नाही, बुथचं वाटप न झाल्यानं कर्मचाऱ्यांना मनस्ताप होत आहे.
डहाणूमध्ये बविआला मोठा धक्का, उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेशडाहाणूमध्ये बविआला मोठा धक्का बसलाय. येथे उमेदवारनेच भाजपमध्ये प्रवेश केलाय. बविआचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश, संशयितांवर सीसीटीव्हीची करडी नजरनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज
बंदोबस्तात शहर पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ), राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), शीघ्र कृती दल (क्यूआरटी) आणि होमगार्ड यांचा समावेश
मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल बाळगण्यास मनाई तसेच केंद्राच्या शंभर मीटर परिसरात छायाचित्रणास सुद्धा बंदी
Maharashtra News Live Updates: नाशिकमधील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात- नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात
- हा अपघात नसून हा घातपात असल्याचा अविनाश शिंदे यांचा आरोप
- प्रचाराला जात असताना मागच्या बाजूने येऊन एका अज्ञात वाहनाने शिंदे यांच्या गाडीला धडक दिल्याची त्यांची तक्रार
- अविनाश शिंदे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत असल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
- नाशिकमधील खाजगी रुग्णालयात शिंदे यांच्यावर उपचार सुरू
उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर दाखल- शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर झाले दाखल
- उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारून तुळजापूरकडे झाले रवाना
- उद्धव ठाकरे आज पत्नी रश्मी ठाकरेंसह तुळजाभवानीमातेचे दर्शन घेणार
संजय शिरसाटमधल्या काळात मनोज रंगीची तब्येत ठीक नव्हती म्हणून आज वेळ मिळाला तर त्यांची भेट घेतली. माझा मनोज जरांगे यांच्यासोबत संबंध स्नेहपूर्ण आहेत. राजकारणाव्यतिरिक्त काही विषय असतात त्याविषयी चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर थोडीफार चर्चा होती, जास्त त्याविषयी खोलात जात नाही. अकोल्याजवळच्या रिधोरा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर 'द बर्निंग ट्रक'चा थरार.अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकने पेट घेतलाय.. चारकोल वाहून नेणाऱ्या ट्रकला सकाळी साडे 11 वाजताच्या सुमारास आग लागलीए. ट्रकमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला.. बघता बघता ट्रकने पेट घेतलाये.. ट्रक आणि ट्रकमधील संपूर्ण चारकोल म्हणजेच कच्चा कोळसा जळून खाक झालाय. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. मात्र वाहनासह ट्रक मधील वस्तूंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील बाळापुर-अकोला रस्त्यावरील व्याळा जवळ ही घटना घडली.
Jalna : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण,जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे .जालना जिल्ह्यत एकूण 1755 मतदान केंद्र असून जिल्हयात एकूण 16 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे..मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 7917 कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले आहेत. दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी जालना जिल्ह्यामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे 4000 कर्मचारी, अधिकारी आणि होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त जालना जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहे त्यामध्ये 2500 कर्मचारी अधिकारी,1400 होमगार्ड ,900 बाहेर जिल्ह्यातून मागवलेले कर्मचारी अधिकारी आणि जवळपास एस आर पी एफ ,बी एस एफ आणि रेल्वे विभागाच्या मिळून एकूण सात कंपन्या जिल्ह्यामध्ये तैनात असणार आहे.
Pune News Live Updates: पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडतीPune News Live Updates: पुण्यातील कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदीत अडीच हजार गुन्हेगारांवर कारवाई
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांची झाडाझडती
गेल्या दोन दिवसांत राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीत गुन्हे शाखेकडून १५ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई
सराइतांकडून २५ पिस्तूल आणि ३८ जिवंत काडतुसे जप्त
कोयते आणि धारदार हत्यारे बाळगणाऱ्या आरोपींकडून ८१ हत्यारे जप्त करण्यात आली
Maharashtra Breaking News : धुळ्यात आक्षपार्ह पत्रक वाटणाऱ्याविरोधात गुन्हाविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात आक्षपार्ह पत्रक वाटपा संदर्भात धुळ्यात निवडणूक आयोगातर्फे करण्यात आला गुन्हा दाखल
विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त पोस्टर वाटप करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास येतात अज्ञात व्यक्ती संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल
पोलीस प्रशासनास पत्रक वाटपा संदर्भात तपासाचे व सखोल चौकशीचे निवडणूक विभागातर्फे आदेश करण्यात आले जारी
Maharashtra Breaking News : पालघर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्जपालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक
पालघर ,बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा आणि वसई असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ
सहा विधानसभा मतदार संघामध्ये 22 लाख 92 हजार इतके मतदार
एकूण 2278 मतदान केंद्र
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 12500 अधिकारी कर्मचारी 4000 पोलिस कर्मचारी 2000 होमगार्ड तसेच आठ एस आर पी एफ तुकड्या तैनात.
उद्याच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज प्रत्येक विधानसभा निहाय ईव्हीएम मशीनचे वाटप.
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढत.
निवडणूक कर्मचारी मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना, पोलिसांचा चोख बंदोबस्तउद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग पूर्णतः तयार असून आज निवडणूक कार्यालयातुन मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना झाल्यात. निवडणूक कर्मचारी मतपेट्या घेऊन आपआपल्या मतदान केंद्रावर निघाले असून पोलिसांकडून चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आलाय. बेलापूर विधानसभेत 384 तर ऐरोली विधानसभेत 447 मतदान केंद्र असून उद्या या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
कसबा मतदारसंघात मतदानाच्या एक दिवस आधी झळकले एक मराठा लाख मराठाचे बॅनर्समनोज जरांगे पाटील यांच्या फोटोसह 'कसब्यात मराठा उमेदवार ओळखा' असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहे. कसब्यात काँग्रेस, भाजप, मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार ओबीसी आहेत. माजी महापौर आणि अपक्ष लढणाऱ्या कमल व्यवहारे एकमेव मराठा उमेदवार आहे. पोस्टरवर एक मराठा लाख मराठाच्या घोषणेसह जरांगे पाटलांचा फोटो वापरला आहे.
प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणारदोन आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने, तर प्रचार संपल्यानंतर आज उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. दोन आठवड्यापासून महाराष्ट्रभर फिरत 40 पेक्षा जास्त सभा उद्धव ठाकरे यांनी घेत आपला झंजावाती प्रचार दौरा पूर्ण केला आहे . काल प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. दोन आठवड्यापूर्वी जेव्हा प्रचाराला उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली तेव्हा प्रचाराची पहिली सभा घेण्यापूर्वी कोल्हापुरात जाऊन उद्धव ठाकरे यांनी आई अंबाबाईचा दर्शन घेतलं होतं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेत आपला दौरा पूर्ण केला.
Maharashtra News Live Updates: मराठा उमेदवार ओळखा, कसब्यात लागले बॅनरकसब्यात मराठा उमेदवार ओळखा, अशा आशायचे बॅनर पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात लागले आहेत. एक मराठा लाख मराठा असा या बॅनर वर उल्लेख, हे बॅनर नेमके कोणी लावले हे समजू शकलेले नाही
Pune News : स्वारगेट परिसरात आज वाहतुकीत बदलपुण्यातील स्वारगेट परिसरात आज वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गणेश कला क्रीडा रंगमंच येथून मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतपेट्या आणि अन्य साहित्य पीएमपी बसने वितरित करण्यात येणार असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. आज आणि बुधवारी उद्या हे बदल केले जाणार आहेत. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या मार्गिकेने जावे. उजव्या मर्गिकेवर मतदान साहित्याची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बससाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडा येथून आधीक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे...