Vinod Tawde: बहुजन विकास आघाडीचे डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप केला होता. सकाळापासूनच हा हायहोल्टेज ड्रामा सुरु आहे. त्यातच आता ही एक मोठी बातमी आली आहे.
बहुजन विकास आघाडीला डहाणूमध्ये मोठा धक्का बसला आहे. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असताना त्याच्या एक दिवस अगोदरच मंगळवारी सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आज काय घडलं?विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वमधीलल विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले.
बविआच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप केला आणि राडा घातला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु झाली. तर पोलिसांना हाॅटेलच्या एका खोलीतून लाखो रुपयांची रक्कम जप्त केली तर तावडेंकडे सापडलेल्या डायऱ्यांमध्ये 15 कोटींचा उल्लेख असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.