ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘बीसीसीआय’च्या महिला संघनिवड समितीने मंगळवारी हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची घोषणा झाली. तीन एकदिवसीय सामन्याच्या या मालिकेसाठी सलामीवीर शेफाली वर्मा हिचा संघातून पत्ता कट करण्यात आला. याचबरोबर हरलीन देओलचे वर्षभरानंतर हिंदुस्थानी संघात पुनरागमन झाले आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानची वन डे मालिका 5 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
बोर्डाच्या परीक्षेमुळे मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतलेल्या ऋचा घोष हिचीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या 16 सदस्यीय संघात प्रिया पूनिया, लेगस्पिनर मिनू मणी व वेगवान गोलंदाज टिटस साधू यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्याने शेफाली शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत तिला केवळ 56 धावा करता आल्या. अष्टपैलू हरलीन देओलने गतवर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत अखेरचा वन डे सामना खेळला होता.
निवड झालेला हिंदुस्थानी संघ
हरमनप्रीत कौर (कर्नाधर), स्मृती मानधना, प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिनू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तीतस साधू, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर आणि साई.