महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच नाशिकमधील नांदगावमध्ये मोठा राडा झाला आहे. मिंधे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारीही झाली. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.