कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
विजय केसरकर, एबीपी माझा November 20, 2024 03:13 PM

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur District Assembly Constituency) पहिल्या चार तासांमध्ये 20.59 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघांपैकी पहिल्या चार तासांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली. करवीरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 26.13% मतदानाची नोंद झाली. करवीरमध्ये काँग्रेसचे राहुल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. कागलमध्ये 23.68 टक्के मतदानाची नोंद झाली, तर राधानगरी भुदरगड मतदारसंघांमध्ये 23 टक्के मतदानाची नोंद झाली. राधानगरी भुदरगड मतदारसंघामध्ये सुद्धा चुरशीची लढत होत असून या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार केपी पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

कागलमध्ये चुरशीशी लढत कायम असून कागलमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 23.68 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे यांनी बोगस मतदानाचा आरोप केला आहे. त्यांनी बोगस मतदानावरून प्रशासनाला इशारा दिला आहे. पालकमंत्री दमदाटी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, कागलमधून हसन मुश्रीफ यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. 

दुसरीकडे, सकाळी 11 पर्यंत कोल्हापूर दक्षिण मतदार संघामध्ये 17.57 टक्के मतदानाची नोंद झाली आहे, तर कोल्हापूर उत्तरमध्ये 20.75 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदानाचा हक्क बजावत मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, हातकणंगले मतदारसंघांमध्ये तुलनेत पहिल्या चार तासात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत हातकणंगले मतदारसंघांमध्ये 14.25 टक्के मतदानाची नोंद झाली. चंदगड विधानसभेला 22.1 टक्के मतदानाची नोंद झाली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.