Shirpur Voting EVM : उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार बंद
esakal November 20, 2024 04:45 PM

शिरपूर : आज २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये आज बंद होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता पणाला लागले आहे.

रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूकिमध्ये भाजपाचे अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख ,माहा युतीचे उमेदवार तथा शिवसेनेच्या विधान परिषद आमदार भावना गवळी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार अमित झनक या तिघांमध्ये काट्याची व तिरंगी लढत होत आहे. दिनांक १८ नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दरम्यान उमेदवार व उमेदवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते जीवाचे रान करताना दिसून येत आहेत.

आज २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत . एकूण ३ लाख २३ हजार ६१२ मतदार मतदान करणार आहेत.या उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे. २३ तारखेला उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होणार आहे. निवडणूक काळातील प्रचारादरम्यान उमेदवारांनी वैयक्तिक टीका टिप्पणी न करता उमेदवाराकडून विकासाच्या मुद्द्यावर प्रचाराच्या फैरी झडून आल्याचे दिसून आले.

हेही वाचा

तब्बल ३५ वर्षापासून या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व झनक घराण्याकडे आहे. स्व.रामराव झनक,स्व.सुबाश झनक,व विद्यमान आमदार अमित झनक या मतदार संघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहे. असे असले तरी मतदारसंघाचे शैक्षणिक मागासलिपण, औद्योगिक मागासले पण, बेरोजगारी ,शेती व्यवसायाच्या समस्या, पांदण रस्ते अशा अनेक मोठ्या समस्या कायमच राहिल्या आहेत.

मतदारसंघांमध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे उद्योग व्यवसाय येऊ शकले नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कायम राहिले आहे.त्यामुळे च वाशिम जिल्ह्याचे मागासलेपण शासन दरबारी आजही कायम आहे. आजही अनेक बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. बहुतांश मतदार शेतकरी असताना शेती व्यवसायातही मतदारसंघ मागासलेलाच ठरला आहे.

जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष अजूनही भरून निघालेला नाही .मागच्या पाच वर्षापासून मालेगाव तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एकही सिंचन विहीर झाली नाही ही शोकांतिकाच आहे.व त्यामुळे आज या मतदारसंघातील शेती सिंचनाखाली आली नाही ही वस्तुस्थिती अजही कुणी नाकारू शकत नाही.

वीस तारखेला मतदार राजा बदल घडवून आणनार का- का पुन्हा प्रस्थापितांना संधी देनार याचा निर्णय मतदान रूपाने मतदारराजा घेणार आहे. येत्या२३ तारखेला जनता जनार्दनाने घेतलेला निर्णय जाहीर होणार आहे. एकूणच या मतदारसंघातील निवडणूक ही तिरंगी होणार असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत गोळे ,भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे विष्णुपंत भुतेकर यांना होणारे मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार यावरही या तीनही उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

दरम्यान आज होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून व विविध सामाजिक घटकांकडून देशहितासाठी व लोकशाहीच्या संवर्धनासाठी शंभर टक्के मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

पाटील/ देशमुख वादाची अफवा

रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये पाटील देशमुख वाद उफाळून वाल्याचा आजपर्यंतचा इतिहास नाही .२००९ व २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी तब्बल ६८ हजार एवढे मताधिक्य घेतले होते. मराठा पाटील बहुसंख्य असलेल्या मतदारसंघांमध्ये हा कुठेही वाद नसल्याचे दिसून येते परंतु राजकीय फायद्यासाठी अशा बाबी जाणीवपूर्वक पेरल्या जात असल्याचे दिसून येते.

हेही वाचा

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

आज होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दिनांक १९ रोजी ईव्हीएम मशीन सह सर्व अधिकारी ,कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शिरपूर येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत मतदान प्रक्रिया पार पडण्यात येणार आहे.

#electionwithsakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.