1750 - "म्हैसूरचा वाघ' म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध व पराक्रमी योद्धा टिपू सुलतान याचा जन्म. याचे पूर्ण नाव शाहबहादूर फतेअली खान.
Dinvishesh 20 November1927 - न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म. सर्च, मणिभवन, सर्वोदय आश्रम (नागपूर), स्त्री आधार केंद्र (पुणे) अशा अनेक संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत.भारत सरकारने "पद्मभूषण' सन्मानाने त्यांना गौरविले.
Dinvishesh 20 November1973 - प्रबोधनकार या नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक, लेखक, पत्रकार केशव सीताराम ठाकरे यांचे निधन. अभिनिवेशयुक्त, सडेतोड, ठाशीव आणि प्रखर भाषा हे त्यांच्या वाणी-लेखणीचे वैशिष्ट्य होते.
Dinvishesh 20 November1985- मायक्रोसाॅफ्ट विंडोज १.० प्रणाली प्रकाशीत
Dinvishesh 20 November1987- श्रीलंकेतील तामीळ बंडखोरांविरोधातल्या शांतीसेनेच्या लढाईत भारताकडून एकतर्फी युद्धबंदीची घोषणा
Dinvishesh 20 November1997 - अमेरिकेच्या कोलंबिया अवकाशयानातून भारतीय अंतराळवीर कल्पना चावला मोहिमेवर रवाना झाली. पहिली भारतीय महिला अंतराळवीर बनण्याचा मान त्यांनी पटकाविला.
Dinvishesh 20 November1997 - अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष शांताराम शिवराम ऊर्फ आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन. बाळाराव सावरकरांनी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांचे कार्यकर्तृत्व, समग्र वाङ्मय प्रसिद्ध करून मोठे कार्य केले.
Dinvishesh 20 November2008 - आर्थिक संकटामुळे अमेरिकेच्या डाऊ जोन्स निर्देशांकात १९९७ पासूनच्या निचांकी पातळीवर घसरण
Next : आई शेतमजूर, वडील गवंडी काम करून पोट भरायचे; लेकानं साहेब होत ठोकला 'सॅल्यूट'