Marathi Celebrities : पुढच्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्राच्या (Maharashtra Assembly Elections 2024) सत्तेची चावी कुणाच्या हाती जाणार यासाठी मतदारांनी त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी राज्यातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळालं. अनेक सेलिब्रेटींनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) राजकीय नेत्यांना महत्त्वपूर्ण आवाहन देखील केलं.
अभिनेता श्रेयस तळपदे, शशांक केतकर, सयाजी शिंदे,आदेश बांदेकर,सुचित्रा बांदेकर यांसह अनेकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता शशांक केतकरने तर त्याचा मतदान केल्याचा फोटो शेअर करत भारतीय जनतेचा जाहीनामाच सांगितला आहे. तसेच अभिनेता श्रेयस तळपदे यानेही एबीपी मझासोबत संवाद साधताना मतदारांच्या मताचा आदर ठेवावा असं आवहन राजकीय नेत्यांना केलं आहे.
शशांकने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, भारतीय जनतेचा अधिकृत जाहीरनामा...राजकारण्यांसारखा प्रत्येकाकडे भरपूर पैसा...राजकारण्यांसारख्या प्रत्येकाकडे कार...राजकारण्यांसारखी प्रत्येकाची मोठी घरं...भारतीय लोकसंख्या बघता शुद्ध हवा, शांतता, स्वच्छ परिसर, पाणी, खड्डे नसलेले मोठे रस्ते, शिक्षणाच्या उत्तम सोयी, उत्तम इस्पितळं, बागा, सुरक्षित समाज, शून्य भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान हक्क, हाताला काम...2025 उजाडणार आहे.. निदान या कॉमन मिनिमम गोष्टी तरी मिळू दे!
अभिनेता श्रेयस तळपदेने एबीपी माझासोबत संवाद साधताना म्हटलं की, काहीही झालं तरी लोकांनी येऊन मतदान नक्की करावं. कारण हे असं सगळं होतं, मग मतदान नकोच करायला, ह्यामध्ये नको पडूयात आपण.. मला वाटतं की, आपला हक्का आहे हा, तो आपण बजावायलाच हवा.. सगळ्यांची आता अपेक्षा आहे, जे काही मागच्या काही वर्षात झालं ते पुन्हा घडू नये.. कारण असं जर घडायला लागलं,तर मग या मतदानाच्या प्रक्रियेचा, निवडणुकीला काहीच अर्थ उरणार नाही. आपली फसवणूक झाल्याची भावना मनात होते. त्यामुळे पुन्हा असं घडू नये इतकीच किमान अपेक्षा आहे.. राजकीय पक्ष जी काही आश्वासनं देतात, ती तुम्ही पूर्ण करा..आम्हीच काहीच सांगत नाही तुम्हाला.. तुम्हीच अजेंडा घेऊन येता आम्ही असं करु तसं करु.. मग तुम्ही ते पूर्ण करा.. या संपूर्ण प्रक्रियेचा आदर करुन, जर ह्याप्रमाणे गोष्टी होत नसतील, जो कौल आम्ही दिलाय, तसं होत नसेल तर लोकांकडे दुसरा मार्गही आहे.
आदेश बांदेकर यांनीही एबीपी माझासोबत संवाद साधताना म्हटलं की, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्याचा दिवस आहे. जे काही आज आजूबाजूला घडतंय, ते बघितल्यानंतर काय सत्य आहे, हे स्पष्ट करणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे..
सुचित्रा बांदेकर यांनी म्हटलं की,गेल्या दोन-अडीच वर्षात जो सावळा गोंधळ सुरु आहे, जो आम्ही बघतोय, त्याच्याबद्दल सतत चीड निर्माण होतेय..हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं आणि बदलायचंय, तो दिवस आज आलाय... आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे नुसतं धर्म, जात न करता त्याच्या पुढे जाऊन रोजगार,महिला सुरक्षा या सगळ्या गोष्टींसाठी मी मतदान केलंय.
View this post on Instagram