Belapur Vidhan Sabha : बेलापूर विधानसभा मतदारसंघ : मंदा म्हात्रे, संदीप नाईक अन् गजानन काळे यांच्यात तिरंगी लढत
Belapur Vidhan Sabha Election 2024 : बेलापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बेलापूर मतदारसंघात मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बेलापूर मतदारसंघात मनसेचे गजानन काळे विरुद्ध भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि नुकताच शरद पवार गटात प्रवेश केलेले संदीप नाईक यांचं आव्हान असणार आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
- संदीप नाईक (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष)
- मंदा म्हात्रे (भाजप)
- गजानन काळे (मनसे)
बेलापूर मतदारसंघ विधानसभा निवडणूक निकाल 2019
- मंदा म्हात्रे (भाजप) - 87,858 मते (विजयी)
- अशोक गावडे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 44,261 मते
बेलापूर मतदारसंघ विधानसभा निवडणूक निकाल 2014
- मंदा म्हात्रे (भाजप) - 55316 मते (विजयी)
- गणेश नाईक(राष्ट्रवादी काँग्रेस) - 53816 मते
- विजय नाहटा (शिवसेना) - 50983 मते
इतिहास आणि मतदारसंघातील सद्याची स्थिती
2019 च्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी बाजी मारली. 2014 च्या विधानसभा निडवणुकीत बेलापूर भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी पराभव केला. त्या राज्यातील जायंट किलर ठरल्या होत्या. नवी मुंबई-ठाण्यातील खासदारकी, दोन आमदारक्या, महानगरपालिका महापौर अशी सगळीच पदे आपल्या घरात ठेवणाऱ्या राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांच्या विजयी घौडदोडीला 2014 च्या लोकसभेत ब्रेक लागला. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी संजीव गणेश नाईक यांचा पराभव करुन पुन्हा एकदा ठाण्यावर शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या मंदाताई म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा धक्कादायक पराभव केला.
भौगोलिक रचना आणि जातीय समीकरणं
बेलापूर विधानसभा हा काॉस्मोपाॉलिटीन आणि उचभ्रू वस्तीचा आहे. महानगरपालिकेचे येथून 55 नगरसेवक निवडून जातात. वाशी, सानपाडा, पामबीच रोड, नेरूळ, सी
बीडी हा मुख्यत्वे मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू लोकांचा भाग आहे. तर तुर्भे हा अत्यल्प उत्पन्न गट आणि झोपडपट्टी बहूल विभाग आहे. मराठी माणसांबरोबर इतर राज्यातील मतदारसंख्या चांगली असल्याने याचा प्रभाव मतदानावर पडला.
मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ
नवी मुंबईतीलच असल्याने या दोन्ही मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. त्यामध्ये नवी
मुंबई सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकाम केलेली घरे नियमित करून त्यांना प्राॉपर्टीकार्डाचं वाटप करणं.
बेलापूर मतदारसंघाला आर्टिस्ट कॉलनी असंही म्हणतात, इथे तुम्हाला धबधबा आणि तलाव अशी नैसर्गिक ठिकाणे आहेत. बेलापूरमध्ये आंब्याची बाग, बेलापूर जेटी, बेलापूर किल्ला, पारसिक हिल्स यासारखी इतर सार्वजनिक ठिकाणे आहेत आणि नेरूळ आणि खारघरच्या आसपासही प्रेक्षणीय स्थळे आहेत.