रात्री लवकर जेवण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या
GH News November 20, 2024 06:13 PM

तुम्ही रात्रीचे जेवण खूप उशीरा करता का? असे असेल तर हे काळजीचे कारण असू शकते. कारण, आपण उशिरा जेवल्यानं यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याचे अनेक तोटे देखील आहे. जेवण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात याचे तोटे सहन करावे लागू शकतात. याविषयी विस्ताराने जाणून घ्या.

आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. याशिवाय आपण कधी जेवतो म्हणजे कोणत्या वेळी जेवण करतो, हे देखील खूप महत्त्वाचं असतं. निरोगी राहण्यासाठी ज्याप्रमाणे ठराविक वेळेत झोपणे आणि उठणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे निरोगी राहण्यासाठी योग्य वेळी जेवण करणे देखील खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला लवकर जेवण करण्याच्या म्हणजेच योग्य वेळेत जेवण्याच्या अशाच काही फायद्यांविषयी सांगणार आहोत. याविषयी विस्ताराने जाणून घ्या.

रात्री वेळेत जेवण करण्याचे फायदे

  1. पचनसंस्थेला आराम द्या- लवकर जेवण केल्याने पचनसंस्थेला रात्रभर विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळतो.
  2. सुरळीत पचन- दिवसा पचनसंस्था अधिक सक्रिय होऊन सुरळीतपणे काम करते. मग जसजशी संध्याकाळ होत जाते तसतसे पोट आणि आतड्यांमधील आम्ल आणि सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य स्राव कमी होतो. हेच कारण आहे की, रात्री जेवण केल्याने पचनसंस्थेला ते नीट पचवता येत नाही. त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर करा जेणेकरून जेवण सुरळीत पचेल.
  3. अ‍ॅसिडिटीपासून आराम: रात्रीचे जेवण लवकर केल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा अ‍ॅसिडिटीने त्रस्त लोकांना मोठा आराम मिळतो.
  4. उपवास असाही करा: रात्रीचे जेवण लवकर केल्याने रात्री 12 ते 14 तास पोटाला आराम मिळतो. यासोबतच एक प्रकारचा उपवासही केला जातो. उपवास करणे सहसा अवघड वाटू शकते, परंतु अशा प्रकारे लवकर जेवून पोटाला आराम दिल्यास झोपेत चांगली होते आणि पचनही.
  5. झोपेची गुणवत्ता सुधारते: जेव्हा रात्री अन्न पचवण्यासाठी शरीर आणि पचनसंस्था मेहनत घेत नाही, तेव्हा शरीराला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे गाढ विश्रांती मिळते.
  6. वजन नियंत्रित होते: रात्रीचे जेवण लवकर केल्याने भूक नियंत्रित होते. रात्री खावं वाटत नाही. शरीर कॅलरी बर्न करण्यास सक्षम होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  7. आपण उशिरा जेवल्यानं यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याचे अनेक तोटे देखील आहे. त्यामुळे वरील माहितीच्या आधारे तुम्ही योग्य वेळी जेवण केल्यास कोणतेही दुष्परिणाम होणार नाही.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.