Maharashtra Assembly Election 2024 Voting Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! राज्यात 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान
Times Now Marathi November 20, 2024 07:45 PM

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live Updates: महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीकोणातून पाहायचं झालं तर 2024 ची अत्यंत महत्त्वाची आहे. कारण राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्षांत पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडीत प्रमुख लढत होत आहे. त्यात मनसे आणि तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तिनेही आपले उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतो कोणाला कौल देते, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.



विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी बुधवारी (20 नोव्हेंबरला) एकाच टप्प्यात होत आहे. राज्यातील अनेक दिग्गजांचं राजकीय भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे निकालाच्या दिवशी समजणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामाचे प्रत्येक अपडेट्स पाहा फक्त 'टाईम्स नाऊ मराठी'वर...





© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.