देहूरोड, ता. ३ ः अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीमुक्ती आंदोलनात हुतात्मा झालेले कोठारी बंधू आणि कारसेवकांच्या स्मरणार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल देहूरोड प्रखंडाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. वैश्य समाज मंदिरात झालेल्या शिबिरात १२१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी बजरंग दल देहूरोड प्रखंडातील सर्व वीर बजरंगींनी परिश्रम घेतले. सुनील अगरवाल, मुकेश पाठक, बजरंग कांबळे, आशुतोष घनवट, अनिकेत घनवट,उमेश मराठे, तुषार राऊत, सचिन घाडगे, नीलेश दांगट यांनी संयोजन केले.