Maharashtra Politics : महायुतीच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला; भाजपकडे २२ मंत्रिपदे, एकनाथ शिंदे -अजित पवारांना काय मिळणार?
Saam TV December 03, 2024 09:45 PM

मुंबई : महायुतीच्या सरकारच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. महायुती सरकारचा पाच डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. या शपथविधी कार्यक्रमात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये भाजपकडे २१ ते २२ मंत्रिपदे असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रिपद राहण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद देखील भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदावर त्यानंतर चर्चा होणार आहे. नव्या सरकारच्या शपथविधीच्या दिवशी एकनाथ शिंदे गटाचे ११ ते १२ मंत्री असण्याची शक्यता आहे. तर गटाचे १० मंत्री असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने १६ मंत्रिपदाची मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या नव्या सरकारकडे गृह आणि महसूल विभागाची मंत्रिपदे असण्याची शक्यता आहे. तसेच भाजपकडे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती असण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला अर्थमंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदाची चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर १६ डिसेंबर रोजी नागपुरात विधानसभेचं हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे.

मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होईल. या बैठकीत नव्या मुख्यमंत्रिरपद ते मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे. दरम्यान, काळजीवाहू एकनाथ शिंदे हे सध्या आजारी आहेत. त्यामुळे महायुतीच्या अनेक बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात अनेक चाचण्या केल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १० दिवस उलटून गेले आहेत. तरीही मुख्यमंत्रिपदाचं नाव गुलदस्त्यात आहे. मुख्यमंत्रिपद महायुतीत भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवार यांचा पाठिंबा आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. परंतु त्यांनी भाजपच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. महायुतीत भाजपने १३२ जागा जिंकल्या. शिंदे गटाने ५७ जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.