rat३p९.jpg-
२४N२९०१६
सावंतवाडी ः येथे झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू क्रीडा क्रिकेट स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी विजेतेपद पटकावले.
रोटरी क्लबचा चषक रत्नागिरीकडे
डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू स्पोर्ट्स; क्रिकेट स्पर्धेत वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे सिंधुदुर्ग रोटरी डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू क्रीडा स्पर्धा सावंतवाडी येथे झाल्या. या स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी विजेतेपद पटकावले तसेच कॅरम, टेबलटेनिस, अॅथलेटिक्स या स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळवून मानाचा क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्लबचा चषकदेखील रत्नागिरीने मिळवला.
रोटरीतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत सावंतवाडी, वेंगुर्ला, बांदा, रत्नागिरी, मालवणमधील संघ सहभागी झाले होते. या स्पर्धांचे उद्घाटन सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी संस्थान यांच्या हस्ते संपन्न झाले. डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पीएचएस रमेश तिवारी, असिस्टंट गव्हर्नर डॉ. विद्याधर तायशेटे, असिस्टंट गव्हर्नर रो. महादेव पाटकर, डीसीसी नीलेश मुळये, राजेश घाटवळ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. खेळवण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि वेंगुर्ला संघात अंतिम चुरशीची लढत झाली. या लढतीत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी १३ धावांनी विजय मिळवला.