Maharashtra Live Update : जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी
Saam TV December 03, 2024 09:45 PM
Breaking News taj mahal : जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी

आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

उत्तर प्रदेश पर्यटन विभागाला धमकीचा मेल

ताजमहलची सुरक्षा वाढवण्यात आली

पोलीस आणि सीआयएसएफकडून ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आली

धमकीचा मेल कुणी पाठवला याबाबतचा शोध सुरू

Mahayuti : महायुती सरकारच्या शपथविधीला असणार हिंदुत्ववाची झालर

शपथविधीला हिंदुत्ववाची झालर असणार आहे.

निवडणुकीतील प्रचारापाठोपाठ आता शपथविधीतही दिसणार 'एक हैं तो सेफ हैं"ची झलक

महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात दहा हजार कार्यकर्ते परिधान करणार 'एक हैं तो सेफ हैं" आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट

महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडून पुनरावृत्ती

शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जानेवारी महिन्यात मोकळा होणार ?

२२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागच्या काही वर्षांपासून आहेत प्रलंबित

या सुनावणी नंतर तरी निवडणुका होणार का हे पाहणं महत्वाचं

ओबीसी आरक्षण प्रश्नांमुळे या निवडणुकांना दिली होती स्थगि

Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या आईला पिस्तूल परवाना प्रकरणात दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाने मनोरमा खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय लावला फेटाळून

जमिनीचा वाद सुरू असताना समोरच्या व्यक्तीला मनोरमा खेडकर पिस्तूल दाखवत धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता

यानंतर पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या पिस्तुलाचा परवना रद्द केला होता

मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने मनोरमा खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय फेटाळून लावला आहे

पिस्तूल परवाना रद्द करताना पुणे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नसल्याचे समोर

पिस्तूल परवाना रद्द करताना त्यामध्ये कायदेशीर त्रुटी अढळ्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे

उच्च न्यायालयाने खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा निर्णय रद्द

MPSC Exam: ऐकावे ते नवलच! एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षेत विचारण्यात आला मद्यपानावर प्रश्न

काय आहे हा प्रश्न आणि त्याचे पर्याय

प्रश्न क्रमांक 80

तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयी पासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल ?

(1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे

(2) दारू पिण्यास नकार देईन

(3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन

(4) नकार देईन आणि त्यांना खोटे

Maharashtra Live Update : महायुतीच्या शपथविधी समारंभात १७ ते २५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता

महायुतीच्या शपथविधी समारंभात १७ ते २५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता सूत्रांची माहिती

गुरुवारी आझाद मैदानावर तिन्ही पक्षातील अंदाजे १७ ते २६ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या उपस्थितीत राज्यातील मंत्री घेणार शपथ

राज्याचे हिवाळी अधिवेशन लवकर होणार असून, त्या अनुषंगाने मंत्री पदाचे वाटप होणार

मंत्री कोण आणि कोणाच्या वाटेला किती खाती येणार ? याबाबत अद्याप स्पष्टता नाही

Pune Crime : पेट्रोल चोरीच्या संशयावरून मारहाणीत तरुणाचा मृत्यू

पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून नऱ्हे परिसरात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव महाविद्यालय रस्ता, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

Maharashtra Live Update :आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे वाढली,रुग्णसेवा कोलमडली

परभणी जिल्ह्यातील हजारो रुग्णांच्या सेवेचा आधार असलेल्या शासकीय आरोग्य यंत्रणेला आता रिक्त पदांनी ग्रासले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊनही रिक्त पदाबाबत मात्र ठोस भूमिका घेतली जात नसल्याने कोलमडल्याचे दिसून येते. रुग्णसेवापरभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळत रुग्णसेवा पाहून असलेली जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. परंतु मागील काही दिवसापासून या रुग्णालयात वाढत असलेली रिक्त पदे ही चिंतेची बाब झाली आहे. उपलब्ध मनुष्यबळावर रुग्णसेवा सुरू आहे.

Maharashtra Live Update : अनुप धोत्रे यांना नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली

अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावलीये. त्यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून ही नोटीस बजावण्यात आलीये. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान दिलंय. या नोटिसीला 2 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने धोत्रे यांना दिलेयेत. धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला असा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्याची मागणी चव्हाण यांनी याचिकेत केलीये. लोकसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी होतीय. मात्र धोत्रे यांनी निवडणुकीत 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केलाय. धोत्रेंनी हा खर्च दडवून ठेवण्याचा आरोपही त्यांनी केलाय. खासदार अनुप धोत्रे आता न्यायालयाला काय उत्तर देणार?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणारेय.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातील ज्यूपीटर हॅास्पिटलमध्ये डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार काही उपचारांसाठी चाचणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. Maharashtra Breaking Live Marathi : ईव्हीएमसंदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हटले. त्यानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. Maharashtra Live Update : मुंबईतील वांद्रे येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली

लाखो लिटर पाणी गेले वाया

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी पाणीपुरवठा करणारी लाईन फुटली

यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे

ती लाईन फुटून जवळपास 20 ते 25 मिनिटे झाले असून महा नगरपालिकेकडून अद्याप लाईन दुरुस्त करण्यात आलेली नाही आहे

Maharashtra Live Update : शपथविधीच्या तयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

शपथविधीच्या तयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयात भाजपची जय्यत तयारी सुरू

चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित

शपथविधीसाठी एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण

केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार

साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रित केलं जाणार

मारकडवाडी घटनेच्या मागे रणजितसिंह मोहिते यांचा हात - राम सातपुते

मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर फेर चाचणी मतदान घेण्याच्या मागणी मागे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा हात आहे ,असा गंभीर आरोप भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

Maharashtra Live Update : महायुतीच्या नेत्याची आज बैठक, संजय शिरसाट यांची माहिती Mahayuti: आझाद मैदानावर महायुतीच्या नेत्यांची पाहणी; ५ डिसेंबरला होणार शपथविधी

आझाद मैदान येथे पाहणी करण्यासाठी महायुतीने नेते पोहचले

राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि अनिल पाटील

भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन

शिवसेनेकडून संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएम फोडून 9 लाख लंपास

छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विवेकानंद कॉलेज गेटच्या जवळचे एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्याने गॅस कटरने कापून, पत्रा जाळून आतील 8 लाख 89 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना एक सप्टेंबरच्या रात्री घडली आहे.एटीएम मध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या एजन्सीच्या प्रतिनिधींना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली.

Gulabrao Patil: एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री व्हावेत, गुलाबराव पाटलांची मागणी

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा शिवसेना शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांची आहे. गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदेनांच मुख्यमंत्री करा, अशी मागणी केली आहे.

Devendra Fadnavis:नागपुरातील चहावाला जाणार महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी कार्यक्रमाला

महायुतीच्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस नागपुरात काही खास लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यातीलच एक देवेंद्र फडणवीस यांचे फॅन असलेले गोपाल बावनकुळे हे सुद्धा आहे. गोपाल बावनकुळे हे रामनगर परिसरामध्ये टी स्टॉल चालवतात या ठिकाणी मात्र त्यांनी आपल्या टी स्टॉलवर कुठल्या देवीदेवतांचा फोटो आला होता त्यांची देवेंद्र फडणवीस ह्यांच्यावर असलेलं प्रेम आणि दैवत मनात त्यांचा फोटो दुकानात लावला.

देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे चहा प्यायला आलेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा चहा प्यायला या असे आमंत्रित दिल होत. त्यांनी त्याला होकार दिला होता. मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे मी जरी मुंबईला शपथ घेण्यासाठी जात आहे. पण त्यादिवशी चहा पेंडिंग सुरू राहील आणि मोफत चहा वाटणार असला तरी गोपाल बावनकुळे यांनी साम टीव्ही शी बोलताना सांगितलं.

Nashik Live Update : सत्ता स्थापनेच्या आधीच नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून बॅनरबाजी

- सत्ता स्थापनेच्या आधीच नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून बॅनरबाजी

- शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या भावी पालकमंत्री आशयाच्या बॅनर नंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा भावी पालकमंत्री अशा आशयाचा नाशिक शहरात लागला बॅनर

- राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून छगन भुजबळांचा भावी पालकमंत्री असा लावण्यात आला बॅनर

- दोनच दिवसांपूर्वी भुजबळांना शह देण्यासाठी कांदे समर्थकांनी सुहास कांदे भावी पालकमंत्री अशा आशयाचे लावले होते बॅनर

- नांदगावमध्ये सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ झाली होती हाय व्होल्टेज लढत

- तब्बल ९० हजारांच्या फरकाने कांदेंनी समीर भुजबळ यांचा केलाय पराभव

- सत्ता स्थापनेआधीच महायुतीच्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा

Maharashtra Live Update : मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांची लॉबिंग, थेट दिल्ली गाठली

मंत्रिपदासाठी आमदारांची लॉबिंग

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिल्लीत

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदार संघाचे आमदार किरण लहामटे प्रफुल पटेल यांच्या भेटीला

अजित पवार दिल्लीत असताना आमदार देखील दिल्लीत

Maharashtra Live Update : बॅलेट पेपरवरील मतदान घेण्याचं आंदोलन मागे, मारकडवाडीच्या गावकऱ्यांचा निर्णय Maharashtra Live Update : मारकडवाडीत मतदानासाठी गावकरी दाखल

मारकडवाडी गावात बॅलेटपेपरवर मतदान करण्यासाठी गावकरी दाखल झाले आहेत. मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण पोलिसांचा मतदानाला विरोध आहे. पण गावकरी मतदानावर ठाम आहेत. गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आलाय. मारकरडीत आज मतदान होणार का? याची चर्चा सुरू आहे. आमदार उत्तम जानकर आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली.

संजय राऊत, शिवसेना(UBT) या देशातील विरोधी पक्ष संपवण्याच काम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याच काम दिल्लीतील महाशक्ती करत आहे का अशी शंका मला आहे. कोणाचा आशिर्वाद असल्याशिवाय एकनाथ शिंदे अस काही करू शकतात का ? हा भाजपचा अंतर्गत खेळ आहे. Markadwadi Voting : गावागावातून फेरमतदानाची मागणी - संजय राऊत

मारकडवडी गावात कलम १४४ म्हणजे कर्फ्यु लावला आहे. अजून सरकार यायचं आहे. त्या मतदार संघात भाजपचा पराभव झाला आहे. ते जिंकून देखील फेरमतदान घेत आहेत. हे बेकायदेशीर आहे अस कोण म्हणत ? संजय राऊत

Maharashtra Live Update : तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास 7 जानेवारी पासून होणार प्रारंभ

Maharashtra Breaking Live Marathi Headlines:तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरीनवरात्र महोत्सवाला 7 जानेवारी रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे.शाकंभरी नवरात्र महोत्सवाची 13 जानेवारीला शाकंभरी पोर्णिमेला पुर्णाहुतीने सांगता होईल शाकंभरी नवरात्र महोत्सवातील मुख्य आकर्षण जलयाञा असुन 11 जानेवारीला असणार आहे महोत्सवात 31 डिसेंबर ते 14 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येणार आहे यामध्ये नवरात्र महोत्सवाप्रमाणेच सर्व धार्मिक विधी,छबीना मिरवणूक व देवीच्या अलंकार पुजा मांडण्यात येतात.

Markadwadi Voting : प्रशासनाची बॅलेट मतदान करण्यासाठी परवानगी नाही

पोलिस जवळपास ३ तासाहून अधिक काळ शांत आहेत. बुथ माडल्यानंतर आता अजून नागरिकांची वाट पाहिली जात आहेत. पोलिस प्रशासनाची बॅलेट मतदान करण्यासाठी परवानगी नाही

Maharashtra Live Update : तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळत नाही,तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा गावकऱ्यांचा पन

धाराशिव -शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळावे या मागणीसाठी भूम तालुक्यातील वांगी गावच्या युवक व ज्येष्ठ नागरिकांनी पायात चप्पल न घालण्याचा पन केलाय.सावंत या अगोदर मंत्री होते त्यांनी मतदारसंघासह जिल्ह्यात विकास काम केली आहेत तोच विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी सावंत यांना मंत्री पद गरजेचे आहे.तसेच मुख्यमंत्री यांनी परंडा येथील सभेत सावंत यांना मंत्री करतो अस आश्वासन दिले होते एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के असून ते साहेबांना मंत्री करणाराच आहे तरी आम्ही श्रद्धेपोटी हा पण पाळत असल्याचं गावकरी व तरुण सांगत आहेत.

Markadwadi Voting : मारकडवाडी ग्रामस्थ एकवटले आहेत. मतदान अजूनही सुरू नाही आम्हाला मतदान करायचं आहे, शासन आम्हाला का करू देत नाही. चुकीचं घडल आहे म्हणून आम्हाला मतदान करायचे आहे, असे गावकरी म्हणत आहेत. Markadwadi Voting : मारकडवाडी मतदान प्रक्रियेवर माजी आमदार राम सातपुते यांचे ट्विट

मारकडवाडी येथील मतदान प्रक्रियेवर माळशिरस चे माजी आमदार राम सातपुते यांची भूमिका आता ट्विट द्वारे पुढे येत आहे. जानकर यांच्या एका कार्यकर्त्यांची ऑडियो क्लिप सातपुते यांनी पुढे आणली आहे. जानकर यांना मतदान कमी झाले. हे सगळे पेटीवर घालवायचे. यासाठी हा अट्टाहास आहे. हे या ऑडिओ क्लिप वरून दिसत आहे. त्यामुळे राम सातपुते यांची भूमिका आता ट्विटद्वारे पुढे येत आहे.

maharashtra government formation : शपथविधीसाठी महायुतीची जय्यत तयारी

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण राज्यातील प्रमुख नेत्यांना दिले जाणार

शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण दिले जाणार

राज्यातील प्रमुख नेत्यांसह सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ही निमंत्रण दिले जाणार

Maharashtra Live Update : ९ महिन्यात केवळ वाशिम नगरपालिकेची ७ कोटी रुपये कर वसुली

वाशिम नगर परिषदेने १५ कोटींच्या उद्दिष्टापैकी गत नऊ महिन्यांत केवळ ७ कोटी रुपयांची वसुली केल्याने येत्या ४ महिन्यांत ८ कोटी वसुलीसाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे. वाशिम नगरपालिकेला आर्थिक वर्षातील ९ महिन्यांत ७ कोटींच्या जवळपास महसूल जमा झाला आहे. निम्म्यापेक्षा कमी महसूल वसूल झाल्याने अनेकांचे देणे बाकी आहे. त्यामुळे वाशीम शहराच्या विकासाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षी वाशिम नगरपालिका जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या तुलनेत कर वसुलीत अव्वल ठरली होती.

Maharashtra Live Update : चार उमेदवारांनी फेर मतदान मतमोजणीसाठी अर्ज केला

छत्रपती संभाजीनगरमध्ये चार उमेदवारांनी फेर मतदान मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 उमेदवारांनी 12 ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याच्या मागणीसाठी 5 लाख 66 हजार 400 रुपये निवडणूक विभागाकडे जमा केलेत जानेवारी 2025 मध्ये ईव्हीएम तपासणीची तारीख निश्चित होईल अशी शक्यता आहे. ईव्हीएम वर आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांच्या समोरच मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया आता पार पडणार आहे, पण त्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

Markadwadi Voting : मारकडवाडीत अद्याप मतदानाला सुरुवात नाही

माळशिरसच्या मारकडवाडीत आज सकाळी आठ वाजल्यापासून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा येथील ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे. परंतु आठ वाजून गेल्यानंतरही अद्याप या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाही.

बॅलेट पेपरवर मतदान चाचणी घेण्यास प्रशासनाचा व पोलिसांचा विरोध आहे. तरी येथील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांचे कार्यकर्ते मतदान घेण्यावर ठाम आहेत. ही प्रक्रिया थांबवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे. मात्र अद्याप या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू होते की नाही, याविषयी आता शंका उपस्थित केली जात आहे.

Maharashtra Live Update : मारकडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान, प्रशासनाकडून जमावबंदी

Markadwadi Voting : सोलापूरमधील मारकडवाडीमध्ये आज ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान होत आहे. गावातील मतदान भाजपच्याच बाजूने गेल्यामुळे ग्रामस्थांनी बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय. गावकऱ्यांकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून या मतप्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. गावात पाच डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर गावात ठाण मांडून बसले आहेत. गोळ्या खाऊ पण बॅलेटपेपरवर मतदान घेऊच, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.