हिवाळ्यात अनेकजणांचे पिकनिकचे प्लॅन सुरू होतात. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हवेत गारवा असल्याने वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण हिवाळी ट्रिपचे आयोजन करतात. हिवाळी ट्रिप म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहतात, ते काश्मिर, मनाली सारखी खिशाला कात्री देणारी ठिकाणे. पण, आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा आल्हाददायी अनुभव आणि खिशाला परवडणारी ट्रिप या दोन्ही गोष्टी साध्य होतील अशी काही महाराष्ट्रातील ठिकाणे सांगणार आहोत. जिथे गेल्यावर तुम्हाला सर्व सुखाचा आनंद घेता येईल,
पश्चिम घाट पर्वत रांगेत असलेले खंडाळा हे हिवाळी ट्रिपसाठी उत्तम पर्याय असेल. येथे तुम्हाला हिरवीगार जंगले, दऱ्या, धबधबे यांचा आनंद घेता येईल.
पाचगणी ठिकाण भव्य अशा टेकड्यांनी व्यापलेले आहे. येथे तुम्हाला सिडनी पॉंइट, टेबल लॅंड, राजपूरी लेणी यांसारखी आकर्षक ठिकाणे पाहता येतील.
घोडेस्वारी, रॉक क्लाइंबिग, स्पीड बोटींग यासारख्या साहसी उपक्रमांचा आनंद घेता येईल.
माथेरानमध्ये सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या दृश्यांचा आनंद घेता येईल. माथेरानमध्ये कॅम्पिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग सारखी अॅक्टीव्हिटी करता येईल. याशिवाय येथील वातावरण हे कायमच आनंददायक असते, गाड्यांची गर्दी तुम्हाला दिसणार नाही.
धार्मिक शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते. येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. सुला वाइन्स, कॉइन म्युझियम, दूधसागर वॉटरफॉल, राम कुंड अशी ठिकाणे पाहता येतील.
नयनरम्य ठिकाणी जायचे असेल तर भीमाशंकर हे ठिकाणही उत्तम राहील. याठिकाणचे सरासरी तापमान 13 ते 30 अंश सेल्सिअस पर्यत असते.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हिवाळी ट्रिपसाठी उत्तम पर्याय असू शकतो. येथील राष्ट्रीय उद्यानात वाघ, हरणांच्या प्रजाती, अस्वल, मगरी, सिव्हेट्स प्राणी बघायला मिळतील.
चिखलदरा हे विदर्भातील हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला वाघ, अस्वल, पॅंथरसारखे प्राणी बघता येतील. याशिवाय येथे आसपास भीमकुंड, मेळघाट, नरनाळा किल्ला, बीर तलाव सारखी प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील.
गोवाच्या किनारपट्टीवर आंबोली येथे तुम्ही जाऊ शकता. आंबोली आणि आजूबाजूस 108 शिवमंदिरे आहेत असे बोलले जाते. याशिवाय हिरण्य केशी मंदिर, दुर्ग ढाकोबा मंदिर, नांगरता धबधबा या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येईल.
हेही पाहा –
संपादन – चैताली शिंदे