अभिषेक बच्चनचा विवाहित पुरुषांना विशेष सल्ला, ‘त्यांची बायको सांगेल ते…’
Marathi December 03, 2024 11:26 PM

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या नात्यात आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एवढेच नाही तर हे जोडपं घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चांमध्ये आता अभिषेकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तो विवाहित पुरुषांना सल्ला देताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

फिल्मफेअर ओटीटी अॅवॉर्डसचे 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजन केले होते. येथे बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चननेही उपस्थिती लावली होती. या सोहळ्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तो विवाहित पुरुषांना सल्ला देताना दिसत आहे. त्या सोहळ्यात होस्टने त्याला एक प्रश्न विचारला होता. तुम्ही इतका चांगला डान्स करतात की टीकाकार त्यावर प्रश्न विचारायचे धाडस करत नाही. हे कसे करता तुम्ही? यावर उत्तर देताना अभिषेक म्हणाला की, खूप साधं आहे. याच्याशी त्यांचे काही देणेघेणे नाही. तो तेच करतो जे दिग्दर्शक त्यांच्याकडून करून घेतात आणि तो शांत राहून काम करून घरी येतो.

अभिषेकचे उत्तर ऐकल्यानंतर होस्टने त्याची तुलना त्याच्या पत्नीने केलेल्या नियमांशी केली आणि पुढे सांगितले की, अभिषेक अगदी तिच्यासारखाच आहे. होस्ट म्हणाला की, त्याची पत्नीही असेच म्हणते. यावर अभिषेकने लगेच होकार दिला आणि सर्व विवाहित पुरुषांना हे करावे लागेल असे सांगितले. तो म्हणाला, विवाहित पुरुषांनी त्यांच्या बायका सांगतील तसे करावे. त्याचे हे ऐकून त्याच्यासोबत बसलेल्या अभिनेत्री हुमा कुरेशी आणि फरदीन खानही हसू लागल्या.

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान अभिषेक बच्चन नुकताच ऐश्वर्या रायचे कौतुक करताना दिसला. त्याने ‘द हिंदू’शी संवाद साधताना सांगितले होते की, मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मी घराबाहेर जाउ शकतो. तो म्हणाला होता की,  मी यासाठी पत्नी ऐश्वर्याचे आभार मानतो कारण तिच्याचमुळे तो बाहेर जाऊ शकतो. मुलगी आराध्याची काळजी घेण्यासाठी ऐश्वर्या घरी आहे आणि यासाठी ती तिचे वारंवार आभार मानतो असे बोलला होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.