मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. नागपुरात हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. महायुती सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर विरोधक बोट ठेवत आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र तसेच देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. शाहांच्या या विधानाचे पडसाद विधिमंडळातही उमटताना दिसतायत. राज्यात संपूर्ण जिल्ह्यांत पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर…