Hair Care Tips : लांब आणि घणदाट केसांससाठी वापरा हा घरगुती पदार्थ; महिन्याभरात केसगळतीची समस्या होईल दूर…
GH News December 22, 2024 12:08 AM

लांब आणि घणदाट केस सर्वांनाचं आवडतात. परंतु केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केसगळती, कोंडा यासारख्या समस्या होता. तुम्हाला नैसर्गिक पद्धतीनं केस वाढवायचे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून केसांना लांब, दाट बनवू शकता. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील काही पदार्थ केसांना लावल्यास त्यांचे आरोग्य निरोगी रहाते. माहितीनुसार, निरोगी केसांसाठी त्यांच्यावर जास्त प्रमाणात शॅम्पूचा वापर करणे टाळा. केस धुताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. ओले केसांवर कंगवा फिरवू नका किंवा त्यांच्यामधील गुंता काढू नका यामुळे केसगळतीची समस्या वाढू लागते.

केस स्वच्छ धुतल्यानंतर त्यांच्यावर थोड्या प्रमाणात कंडीशनर लावा कंडीशनरचा अधिक वापर केल्यास केसांवर गंभीर परिणाम होतात. ओले केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करणं टाळा त्यामधील गरम वाफ तुमच्या केसांना फ्रिझी आणि ड्राय बनवते. केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्यावर हेअर कलर किंवा हेअर डायचा वापर करणं टाळा.

केसांच्या निरोगी वाढीसाठी ट्राय करा ‘या’ घरगुती ट्रिक्स..

नारळाचं तेल

नारळाच्या तेलाचा केसावर मसाज केल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते त्यासोबतच केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. केसांमध्ये मॉईश्चर असल्यामुळे कोंड्याची समस्या होत नाही. हलक्या कोमट नारळाच्या तेलाने केसांचा मसाज करा आणि रात्रभर तसंच सोडून द्या. त्यानंतर सकाळी शॅम्पूने केस धुवा. हा घरगुती उपाय केल्यामुळे केस मऊ, मुलायम आणि दाट होतील.

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलमध्ये नैसर्गिक एंजाईम्स आढळतात ज्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. बालकनीमधील एलोवेरा जेल तुमच्या स्काल्पवर लावा आणि हळूहळू मसाज करा. एलोवेरा जेल रात्रभर केसांवर लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हलकल्या कोमट पाण्याने केस घुवा यामुळे तुमच्या केसांवर नैसर्गिक चमक येते त्यासोबतच केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.

कांद्याचा रस

कांद्यामध्ये सल्फर असते ज्यामुळे केसगळतीची समस्या दूर होते त्यासोबतच नवीन केस उगवण्यास मदत होते. कांद्याचा रस तेलामध्ये मिक्स करून केसांच्या मुळांना लावल्यामुळे केस वेगानं वाढण्यास मदत होते.

मेथीच्या बीया

मेथीच्या बीयांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड असते. ज्यामुळे केसांना पोषण मिळते. मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट बनवून केसांच्या मुळांना लावा.

दही आणि मध

दहीमध्ये भरपूर प्रमणात व्हिटॅमिन सी असते आणि मधामध्ये भरपूर पोषण असते. दही आणि मधाचे हेअरमास्क केसांसाठी नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते. एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यामध्ये १ चमचा मध मिसळून केसांच्या मुळांना लावल्यानं या उपायाने केस सॉफ्ट, शायनी, मजबूत होतील.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.