लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. आपल्या मुलांचे चांगले संगोपन व्हावे आणि भविष्यात त्यांना इतरांनी सुसंस्कृत समजावे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते.
म्हणूनच पालक सुद्धा आपल्या मुलांना सुरुवातीपासूनच धार्मिक शिक्षण देतात जेणेकरून त्यांची मुले मोठ्या व्यक्तींचा आदर करतात आणि सुसंस्कृत जीवन जगतात. पण आज आपण जाणून घेऊयात अशा काही आध्यात्मिक सवयींबद्दल. ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता आणि त्यांना मदत करू शकता.
आपल्या मुलांच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण करा. ही अशी सवय आहे जी इतरांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही वाढवते. तसेच, कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही समोरच्या व्यक्तीला समाधान देऊ शकता. मुलांना शिकवा की जर कोणी त्यांचे चांगले केले, त्यांना मिठाई, खेळणी किंवा एखादे भेटवस्तू दिले तर त्यांनी निश्चितपणे त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांना धन्यवाद किंवा थँक्यू म्हटले पाहिजे.
– जाहिरात –
असं म्हणतात की मुलांची हृदये निष्पाप असतात. मुलांना त्यांच्या अंतःकरणात अस्तित्त्वात असलेली निरागसता टिकवून ठेवण्यासाठी दयाळूपणा शिकवा. ही एक आध्यात्मिक सवय आहे. तुमच्या मुलांना दयाळूपणाचे छोटे छोटे धडे तुम्ही देऊ शकता. जसे की पशू-पक्ष्यांना खायला- प्यायला देणे. कोणतेही झाड किंवा रोप न तोडणे. या छोट्या-छोट्या सवयींमुळे तुम्ही मुलांच्या हृदयात, त्यांच्या वागण्यात मोठा बदल घडवून आणू शकता.
– जाहिरात –
मुलांचं मन खूपच चंचल असते. त्यामुळे काही प्रसंगी सजग राहणे आणि प्रसंगावधान ठेवणे ही देखील एक मोठी कला आहे जी प्रत्येकाला जमेलच असे नाही. म्हणूनच ही कला अवगत करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या मुलांना सजग राहण्याचे अनेक मार्ग शिकवू शकता. यामध्ये दीर्घ श्वास घेणे, कोणी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे आणि डोळे बंद करून थोडा वेळ निसर्ग अनुभवणे या गोष्टी तुम्ही त्यांना करण्यास सांगू शकता.
व्यक्तीने चूक केली आहे हे माहीत असतानाही क्षमा करणे सोपे नसते. पण एकदा मनावर ताबा ठेवला की ते खूप सोपे आहे. मुलांना क्षमा करण्याची कला शिकवा की जो क्षमा करतो तो बदला घेणाऱ्यापेक्षा मोठा असतो. मुलांना सांगा की फक्त दयाळू लोकच क्षमा करू शकतात. यामुळे मुलं निर्दयी किंवा निष्ठूर न बनता अधिक संवेदनशील बनतील.
प्रत्येक मुलाच्या मनात जगाबद्दल अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांना अध्यात्माशी जोडा. उदाहरणार्थ, मुलांना विचारा की तुम्हाला हे जग इतके सुंदर का वाटते? मुलांना विचारा की लोक एकमेकांना मदत करतात असे तुम्हाला का वाटते? तसेच मुलांना अध्यात्माशी संबंधित नवीन परंपरा सांगा जेणेकरून त्यांना अधिक जाणून घेण्याची आवड निर्माण होईल.
हेही वाचा : Parenting Tips : मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी बदलायला हव्यात या सवयी
संपादन- तन्वी गुंडये