बोलायला उभे राहिले, चिमुकलीचं नाव काढताच कंठ आला दाटून, संतोष देशमुख यांच्या हत्येवर बोलताना बज
Marathi December 21, 2024 04:25 PM

बीड : जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची हत्या झाल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले आहे. देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा थेट विधिमंडळात उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जे कोणी सामील असतील, त्यांना सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. असे असताना बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) मस्साजोग गावात गेल्यानंतर भावुक झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीचे नाव काढताच त्यांचा कंठ दाटून आला आहे.

बजरंग सोनवणे भावूक झाले

खासदार शरद पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मस्साजोग या गावाला भेट देऊन हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे होते. मस्साजोग येथील गावकऱ्यांशी बोलताना बजरंग सोनवणे भावुक झाले आहेत. त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी तसेच दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली.

या घटनेने काळजाला पिळ पडतोय- सोनवणे

आपण कुठल्या जगात आहोत हे कळत नाही. आमच्या जिल्ह्यात दहशतीचं वातावरण झालंय. की जिल्ह्यात सर्वसाधारण लोकांनी राहायचं की नाही अशी परिस्थिती झाली आहे. या घटनेने काळजाला पिळ पडतोय. या प्रकरणाला महिलांनी वाचा फोडली, असे बजरंग सोनवणे म्हणाले.

मुख्य आरोपीला अद्याप अटक केलेलं नाही- सोनवणे

पोलीस यंत्रणेतील माणसंच यात सहभागी आहेत. मला ही घटना समजल्यानंतर मी साडे तीन ते चार वाजेपासून मी एसपी साहेबांशी बोलत होते. पाटील नावाच्या पीएसआयचे आरोपीसोबतच्या चहा-पाणी पितानेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार, असे सांगितले आहे. पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे. आज 13 दिवस झाले, पण या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेले नाही. आज लहान मुलांमध्येही घबराटीचे वातावरण आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे. मुलीच्या शिक्षणाबाबत काही झालं पाहिजे.

बजरंग सोनवणे व्हिडिओ बातम्या:

हेही वाचा :

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांचं अख्ख कुटुंब भावूक, शरद पवारही स्तब्ध; गावकऱ्यांचाही आक्रोश, मस्साजोग गावात नेमकं काय घडलं?

शरद पवार बजरंग बाप्पांना घेऊन बीडच्या मस्साजोग गावात पोहोचले, संतोष देशमुख हत्याप्रकरणात काय बोलणार?

Dhananjay Munde : विधानसभा कामकाजात आज पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे सहभागी होणार

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.