Papad Chutney Recipe: 8 ते 10 दिवस टिकणारी, जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट पापडाची चटणी
Times Now Marathi December 21, 2024 05:45 PM

Papad Chutney Recipe: जेवण जर खास लागत नसेल किंवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेलल तर आपण लगेच साईड डिशचा वापर करतो. जसे की फक्त वरण भात असेल तर त्यसोबत लोणचे किंवा पापड घेतो. एखादी भाजी आवडत नसेल, किंवा बनवली नसेल तर त्या जागी चपाती किंवा भाकरीसोबत चटणी खाल्ली जाते. हे साइड डिश जेवणात रंग तर वाढवतातच, पण त्याबरोबरच ते एक परफेक्ट पर्यायी पदार्थ देखील बनून जातात. तर आज आपण या साइड डिशच्या यादीतील अशाच एका पर्यायी डिशची रेसिपी जाणून घेणार आहोत. ही डिश खाण्यास कुरकुरीत आणि चटपटीत चवीची लागते.

आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची चटणी खायला आवडते. मग ती लासणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी तसेच आपला परांपारीक ठेचा ही का असेना, भाजीला या चटणी एक जबरदस्त पर्याय बनून जातात. पण आज आपण इथे एका अनोख्या चटणीची माहिती घेणार आहोत.

पापड चटणी रेसिपी
या चटणीच्या नावातच सारे काही आहे. अनेकदा पापड भरपूर भाजले जातात, हे पापड बाहेर राहिले तर ते नरम होतात, आणि त्याचा कुरकुरीतपणा पुरता निघून जातो. पण जर तुम्ही उरलेल्या पापडांपासून चटणी केली तर ती 8 ते 10 दिवस चांगली राहू शकते. शिवाय ही चटणी खाताना ती पापडापासून बनवली आहे, हे कुणाला कळणार देखील नाही. अगदी काही मिनिटात बणणाऱ्या या पापड चटणीची रेसिपी जाणून घेऊया.

ही रेसिपी लतिका निंबाळकर यांनी आपल्या Maharashtrian Recipes या आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेयर केली आहे. अगदी झटपट बनणारी ही चटणी तुम्ही देखील घरी बनवू शकतात.



साहित्य
उडद डाळ पापड
1/2 कप भाजलेले शेंगदाणे
1 टीस्पून लाल मिरची पावडर
चवीनुसार मीठ
8 ते 9 लसूण पाकळ्या
१/२ टीस्पून चाट मसाला पावडर
भाजलेले सुके खोबरे चिरून

कृती
सर्वप्रथम भाजलेले पापड कुस्करून मिक्सरच्या भांड्यात टाका.
त्यानंतर यात भाजलेले शेंगदाणे, लाल मिरची पावडर, लसूण, चाट मसाला, आणि भाजलेले सुके खोरे टाकून चांगले बारीक वाटून घ्या.
अशाप्रकारे अगदी 10 मिनिटत पापडाची चटणी बनून तयार होते.

ही चटणी तुम्ही प्रवासाला देखील घेऊन जाऊ शकता. तसेच वडापाव आणि भजीपाव खाताना तोंडी लावण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. लहान मुलांना देखील या चटणीची चव आवडेल.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.