Marathi Entertainment News : मराठी मालिका विश्वात सध्या अनेक नवीन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. कलर्स मराठी वरील अशोक मा.मा. आणि पिंगा ग पोरी पिंगा या दोन्ही मालिका खूप गाजत आहेत. त्यातच आता स्टार प्रवाहवरही नवीन मालिका सुरू होतेय. तुही रे माझा मितवा असं या नव्या मालिकेचं नाव असून या मालिकेची चर्चा खूप आहे. तर मालिकेच्या प्रोमोनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेय.
अभिजीत आमकर आणि शर्वरी यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेविषयी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. ही मालिका स्टार प्लस वर गाजलेल्या इस प्यार को क्या नाम दु या गाजलेल्या मालिकेचा रिमेक आहे. या मालिकेचे कथानक काय असणार याविषयी जाणून घेऊया.
मालिकेत इंदोरवरून आलेली ईश्वरी आणि मुंबईतील अर्णव यांची गोष्ट दाखवण्यात येईल असा अंदाज आहे. सगळ्यांची मदत करणारी पण वेंधळी असलेली ईश्वरी आणि अतिशय रागिष्ट असलेला, बिझनेस, पैसा या व्यतिरिक्त कसलाही विचार न करणारा अर्णव यांची गोष्ट या मालिकेत असेल. अर्णवला एक बहिणही असते आणि तिचा नवरा वरवर जरी चांगला दाखवत असला तरीही त्याचे हेतू वाईट असतात. अस कथानक या मालिकेत असेल.
शर्वरी अभिजीतबरोबरचं अभिनेत्री रुपल नंद ही स्टार प्रवाहवर कमबॅक करतेय. स्टार प्रवाहवरील गोठ मालिकेतून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर बऱ्याच काळाने ती मालिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री मधुरा जोशीही या मालिकेत काम करणार आहे.
23 डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. रात्री 10:30 वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
rupa