Maharashtra Live Update: शरद पवार बीडमधील मस्साजोग गावात दाखल
Saam TV December 21, 2024 05:45 PM
मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र पढणवीस यांच्यामध्ये विधानभवनात संवाद.. एकनाथ शिंदेंही उपस्थित Maharashtra Live Update: शरद पवार बीडमधील मस्साजोग गावात दाखल Maharashtra Live Update: मराठी माणसाला मारहाण प्रकरण,अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लाला अटक

मराठी माणसाला मारहाण प्रकरण

अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लाला अटक

गीता शुक्लासह विवेक जाधव आणि पार्थ जाधव या दोन तरुणांना अटक

थोड्याच वेळात सहा आरोपींना खडकपाडा पोलीस करणार कोर्टात हजर

Maharashtra Live Update: नागपूरच्या रायसोनी कॅालेज महाविद्यालयात सुरु असलेल्या बॅंकिंगमध्ये तांत्रिक घोळ

- नागपूरच्या रायसोनी कॅालेज महाविद्यालयात सुरु असलेल्या बॅंकिंगमध्ये तांत्रिक घोळ

- तांत्रिक अडचणी असलेल्याचे सांगत विद्यार्थी परिक्षा खोलीच्या बाहेर पडले

- परिक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आक्रमक

- ५०० विद्यार्थी आले होते परिक्षा द्यायला

- १० वाजता पेपर सुरु होणार होता. पण सुरू झालाच नसल्याची माहिती

Uddhav Thackeray & Rahul Gandhi: उद्धव ठाकरे 5 जानेवारी तर राहुल गांधी 10 जानेवारीला मारकवाडीला भेट देणार

ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेत आलेल्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीला उद्धव ठाकरे व राहुल गांधी भेट देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणूक निकालामध्ये आमदार उत्तम जानकर यांना माळशिरसच्या मारकवाडी गावात अपेक्षित मतदान झाले नसल्याने त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली होती. दरम्यान प्रशासनाने त्यांची ही तयारी हाणून पडली .त्यानंतर मारकवाडी हे गाव देशभर चर्चेत आले. याच दरम्यान शरद पवार यांनी देखील मारकडवाडीला भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता येत्या पाच जानेवारीला उद्धव ठाकरे तर 10 जानेवारीला राहुल गांधी, प्रियांका गांधी व अरविंद केजरीवाल हे मारकडवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी व मतदारांशी ईव्हीएम मशीन विषयी चर्चा करणार आहेत.

Solapur: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सलग चार दिवस राहणार बंद

मागच्या दोन दिवसांपासून माथाडी कामगारांनी बंद पुकारला होता.

मात्र जवळपास 40 हजार क्विंटल कांदा मार्केटमध्ये पडून असल्याने आज बाजार समितीने अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.

तर उद्या रविवार साप्ताहिक सुट्टी असल्याने बाजार समिती सलग चार दिवस बंद असणारे आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बंद पुकारण्यात आले आहेत.

बाजार समिती जरी बंद असली तरी आज कांद्याचे लिलाव पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील कांद्यासाठीची अग्रगन्य बाजार पेठ म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते.

त्यामुळे येत्या सोमवारी तरी माथाडी कामगार आपली माघार घेऊन बाजार समिती सुरु करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Live Update: खासदार शरद पवारांचा बीड दौरा; पोलिसांचा मस्साजोगमध्ये तगडा बंदोबस्त

खासदार शरद पवार हे आज बीडच्या मस्साजोग येथील पीडित देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. यावेळी ते देशमुख कुटुंबातील सदस्यांची विचारपूस करून सांत्वन करणार आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय. पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव आणि परिसरामध्ये जवळपास १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पेट्रोलिंग करणारी पोलीस वाहने देखील सुरू आहेत..

Maharashtra Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक

नागपुरात आज भाजपची संघटनात्मक बैठक

भाजपातील अंतर्गत निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत बैठकीचे आयोजन

भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसह आमदार आणि जिल्हाध्यक्ष राहणार उपस्थित

Sangli News : मासे मृत गणेश तलाव प्रकरणी प्रदूषण नियंत्रण तर्फे महापालिकेच्या आरोग्य विभागाला नोटीस..

मिरजेतील गणेश तलावात पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे मेल्या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला नोटीस बजावली आहे. हा प्रकार गंभीर आहे तलावातील कारंजा विनाखंड सुरू ठेवा, तलावात निर्माल्य आणि कचरा टाकणाऱ्याना रोखा, ती जबाबदारी पार पाडण्यात कुचराई झाल्यास मनपावर कारवाई करावी लागेल असा इशारा नोटीस मध्ये दिला आहे.

Washim News : वाशिम जिल्ह्यातील सीसीआयची कपाशी खरेदी केंद्रे बंद; शेतकरी हतबल

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यांमध्ये कपाशीचे उत्पादन घेतले जाते, खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाल्याने सीसीआय कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे सीसीआय केंद्रांवर मोठ्या प्रमाणात माल पोहोचला आहे. मात्र, साठवणुकीसाठी जागा नसल्याने मंगरूळपीर आणि अनसिंग येथील दोन्ही सीसीआय केंद्रावरची खरेदी प्रक्रिया थांबवावी लागली आहे.

मंगरूळपीर येथील सीसीआय केंद्रावर आतापर्यंत ४० हजार क्विंटल कपाशी खरेदी झाली असून, माल जागीच ठप्प आहे. अनसिंग येथील खरेदी केंद्रावरही ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक कपाशी खरेदी झाल्याने साठवणूक क्षमतेचा तुटवडा निर्माण झाला आहे.या परिस्थितीमुळे शेतकरी पुरते हतबल झाले असून, कापसाच्या साठवणुकीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Maharashtra Live Update: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची विमानसेवा फुल्ल

- ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची विमानसेवा फुल्ल

- नव वर्षाच्या स्वागतासाठी ताडोबा आणि गोव्याला नाशिककरांची पसंती

- विमानाची तिकिटे दीड ते तीन पट महागली

- नाशिक गोवा विमानसेवेची ८५ टक्के तिकिटं बुक

- नाशिक नागपूर विमान सेवेचे तिकिटाचे दर ४ हजार रुपयांवरून १३ हजार रुपयांवर

- तर नाशिक गोवा विमानाच्या तिकिटाचे दर देखील ६ हजार रुपयांवरून ११ हजार रुपयांवर

- नाशिकहून दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद विमानसेवेलाही प्रवाशांची पसंती

Maharashtra Live Update: धुळ्याचा पारा वाढला

धुळ्यात आज 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे, काही दिवसांपासून धुळ्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला होता, परंतु आता तापमानाचा पारा हळूहळू वाढत असल्यामुळे वाढत्या थंडी पासून धुळे करांना काहीसा दिलासा मिळाला आहे,

जवळपास आठ ते दहा दिवस चार ते पाच अंश इतक्या निचांकी तापमानाची नोंद धुळ्यात होत होती, परंतु गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Sangli News : धुक्यात हरवली सांगली ,शहरावर पसरले धुक्यांचे साम्राज्य

सांगली शहरामध्ये धुक्यांचं साम्राज्य पाहायला मिळालं.गुलाबी थंडीत आणि धुक्यात सांगली शहर हरवुन गेल्याचे चित्र निर्माण झाले होते.गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला होता,मात्र गेल्या दोन दिवसांपासून थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. तर पहाटे पासून मोठ्या प्रमाणात धुके निर्माण झाले होते.रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकां बरोबर वाहन धारकांना धुक्यातुन वाट काढताना कसरत करावी लागत होती.

Solapur News : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील दोन दिवस देखील कांद्याचे लिलाव राहणार बंद

आज माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्याने उद्या लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत केलेल्या विधानामुळे कालपासून माथाडी कामगार वेगळेवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतायात

आज कांद्याचे लिलाव पार पडले असले तरी माथाडी कामगारांनी माल उचलला नव्हता

त्यामुळे उद्या कांदा बाजारात येणार नसल्याने आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने सलग दोन कांद्याचा लिलाव होणार नाही

Latest Pimpri Chinchwad News : पिंपरीत दाट धुक्याची चादर

पिंपरी चिंचवड शहरात हिवाळ्यात आज पहिल्यांदाच सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. दाट धुक्याच्या चादरी मुळे पिंपरी चिंचवड शहरातील रत्यावरिल दृश्यमानता कमी झाली आहे. अगदी सकाळी आठ वाजता पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात दाट धूक्याची चादर कायम आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज नेहमी पेक्षा थंडीची लाट कमी आहे. मात्र सर्वत्र धुक्यांची चादर पसरली आहे..

Beed News : खासदार शरद पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व खासदार शरद पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.. ते बीडच्या मासा जोग येथील पीडित देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.. सकाळी १० वाजेपर्यंत ते मस्साजोग येथे येणार आहेत. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केल्यानंतर ते परभणीकडे रवाना होणार आहेत.

Maharashtra Live Update: कोकणातल्या जंगलात पट्टेरी वाघाचा अधिवास

रत्नागिरी - कोकणच्या जैवविविधतेत भर घालणारी आणि वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बातमी!

कोकणातल्या जंगलात पट्टेरी वाघाचा अधिवास; रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील जंगलात पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे

चिपळूण तालुक्यातील शिरगांव,तळसरच्या जंगलात आढळून आले पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे

वाघाने केलेली शिकार देखील आली आढळून

वन्यप्रेमीमध्ये आनंद; वनविभागाची जबाबदारी अधिक वाढली

Maharashtra Live Update: पाचगणीत अतिक्रमनावर भल्या पहाटे हातोडा

महाबळेश्वर येथील पाचगणी, भोसेखिंड परिसरातील अतिक्रमनावर भल्या पहाटे हातोडा

अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सकाळी सहा वाजताच सुरवात

वाई प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चार टिम

चार ठिकाणी एकाच वेळी कारवाई

अनेक अनाधिकृत बांधकामे आज दिवसभर पाडणार

Mumbai Crime News : विक्रोळीत टेम्पो लावण्याच्या वादावरून एकाचा मृत्यू

विक्रोळी पार्कसाईट येथे टेम्पो लावण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यात एकाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे अधिक तपास विक्रोळी पार्कसाईड पोलीस ठाणे करत आहे.

Pune Latest News :पुण्याचा पारा वाढला, महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार

गेल्या आठवड्यापासून पुणेकरांना थंडीने गारठून टाकले होते. पण शुक्रवारपासून किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. गुरूवारी किमान तापमानाचा पारा ८ अंशावर होता, तो शुक्रवारी थेट १२ अंशावर पोचला.

आज पुणे शहरात ढगाळ वातावरण असून तापमान हे१२.५ अंशावर आहे. पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार आहे. त्याला सुरवात झाली. किमान तापमानात वाढ होऊन उबदारपणा जाणवू शकतो. पुन्हा वर्षअखेर व नववर्षातील ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शहरातील थंडी (किमान तापमान)

दि. १६ डिसेंबर : ६.१ (एनडीए)

दि. १७ डिसेंबर : ६.५

दि. १८ डिसेंबर : ७.५

दि. १९ डिसेंबर : ७.५

दि. २० डिसेंबर : ११.५

दी. २१ डिसेंबर: १२.५

Pune Live News : पारव्यांना धान्य टाकणं पडलं महागात

शहरात कबुतर-पारव्यांना खाद्य टाकू असे आवाहन महापालिकेने करूनही या आवाहनाला न जुमानता नागरिकांकडून खाद्य टाकले जात आहे. अशा नागरिकांकडून ३७ प्रकरणांमध्ये २८ हजार रुपये दंड पालिकेने वसूल केला. १ डिसेंबरपासून १८ डिसेंबरपर्यंत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

शहरातील कोथरूड, वारजे माळवाडी, नदीपात्र परिसर, अष्टभुजा घाट, नेने घाट परिसर तसेच स्वारगेट परिसर, सारसबाग परिसरात कबुतरे- पारवे बसतात. तेथे धान्य टाकणाऱ्यांकडून पालिकेने दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी कबुतरांना उघड्यावर अन्नपदार्थ टाकू नयेत अन्यथा घनकचरा विभागाने संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते

Nagpur : नागपूर पोलीस सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना पाचव्या दिवशी सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता तसेच पोलिसांची ड्युटी 12 तासांची असून प्रत्यक्षात 14 ते 16 तास ड्युटी होते....

दिवसाचा कामकाजाचा वेळ आठ तास व्हावा सेवानिवृत्तीनंतर आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही... सेवानिवृत्त नंतर मिळणारी वागणूक अपमानजनक असते...

सेवानिवृत्त नंतर सुद्धा तो सन्मान मिळावा....

याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून सेवानिवृत्ती पोलीस कर्मचारी एकत्र येत विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.

Nashik Live Update: नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू

- २१ डिसेंबर ते ०३ जानेवारीपर्यंत शहरात मनाई आदेश लागू

- राज्यातील राजकीय घडामोडी, ख्रिसमस, ३१ डिसेंबर आणि भीमा कोरेगावला १ जानेवारीला होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय

- मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन, रास्ता रोको अथवा निदर्शनं करता येणार नाही

- मनाई काळात स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई

- मनाई कालावधीत प्रतीकात्मक चित्रं, पुतळ्याचे दहन, घोषणा देणं , आक्षेपार्ह वक्तव्य करण्यास देखील सक्त मनाई

- ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक

- विना परवानगी मोर्चे, आंदोलनांना मनाई

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.