हिवाळा हा लग्नासाठी अतिशय लोकप्रिय ऋतू मानला जातो. गारवा, आल्हाददायक वातावरण आणि सणासुदीचा आनंद अशा हिवाळ्यात लग्नाची मजा काही औरच असते. मात्र हिवाळ्यात लग्न करायचे असल्यास ब्रायडल लेहेंगा निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. थंड हवामानात आपण स्टाइलिश दिसण्याबरोबरच उबदार राहणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे ब्रायडल लेहेंगा खरेदी करताना खालील टिप्स नक्की लक्षात ठेवा.
istockphoto
1.कापड निवडताना उबदारता आणि सौंदर्य यांचा विचार कराहिवाळ्यात लग्नासाठी जड आणि उबदार कापडाची निवड उत्तम ठरते. व्हेलवेट, सिल्क, ब्रॉकेड किंवा जरीच्या फॅब्रिकमधील लेहेंगा केवळ भव्य दिसतोच, पण उबदारताही देतो. व्हेलवेट लेहेंगा हा हिवाळ्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो कारण त्यात क्लासी लुक येतो आणि गारठा जाणवत नाही.
2. डिझाइन आणि भरतकामावर लक्ष द्या
हिवाळ्यात भारी भरतकाम असलेले लेहेंगा अधिक शोभून दिसते. झरी, सीक्विन्स, एंब्रॉयडरी किंवा मोत्यांच्या भरतकामाचा विचार करा. लग्नाचा पोशाख जितका भव्य असेल तितका तो थंड हवामानात सुंदर दिसतो. मात्र भरतकामाचा पोशाख अंगावर सहज वाहून नेता यायला हवा.
3.डुपट्ट्याला विशेष महत्त्व द्या
हिवाळ्यात उबदार डुपट्ट्याचा समावेश असलेल्या लेहेंगाला प्राधान्य द्या. डबल डुपट्टा स्टाइल हिवाळ्यासाठी उत्तम ठरतो. एका डुपट्ट्याने उबदारता मिळते तर दुसऱ्यामुळे संपूर्ण पोशाख अधिक डौलदार दिसतो. व्हेलवेट किंवा सिल्क डुपट्टा हा गारव्यात उबदार ठेवण्यासाठी प्रभावी पर्याय ठरतो.
4. रंगसंगती निवडताना ऋतूचा विचार करा
हिवाळ्यात गडद रंग अधिक आकर्षक दिसतात. नेहमीच्या लाल आणि गुलाबी रंगांव्यतिरिक्त मरून, नेव्ही ब्लू, डीप ग्रीन, आणि वाइन अशा गडद रंगांचा विचार करा. हे रंग फोटोंमध्ये देखील भव्य आणि आलिशान दिसतात.
5.ऍक्सेसरीज आणि उबदारतेवर भर द्या
हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासोबतच उबदार राहणे गरजेचे आहे. लेहेंगासोबत शोभेल अशा व्हेलवेट शॉल, केप किंवा जॅकेटचा विचार करा. तसेच चोकर, मोठ्या झुमके, आणि मंगटिका यांसारख्या भारी ऍक्सेसरीज पोशाखाला पूर्णता देतात.
हेही वाचा :Wedding Destinations : भारतातील 8 सुंदर मंदिरे आहेत लग्नासाठी योग्य
हिवाळी लग्नासाठी परिपूर्ण पोशाखहिवाळ्यात लग्न ठरवले असल्यास पोशाखाचा विचार अत्यंत विचारपूर्वक करा. भव्यता, उबदारता, आणि स्टाईल यांचा समतोल साधणारा ब्रायडल लेहेंगा निवडणे हे हिवाळ्यातील वधूसाठी खूप महत्त्वाचे आहे. वर उल्लेखलेल्या टिप्स लक्षात घेतल्या तर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील ब्रायडल लूक मिळवता येईल आणि थंडीतही तुमचे सौंदर्य खुलून दिसेल.