शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील घराची शुक्रवारी दोन अज्ञातांनी रेकी केली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यातच मंत्री नितेश राणे यांनी रेकीवरून टोलेबाजी केली आहे. मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही. त्यासाठी कॉइल लावा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत यांच्या घराची कुणीतरी रेकी केली आहे. मला पहिल्यांदा अनुभव आहे की, मच्छर मारण्यासाठी सुद्धा रेकी करावी लागते. मच्छर मारहण्यासाठी कॉइल लावा. त्याला रेकी करण्याची गरज नाही.”
– Advertisement –
हेही वाचा : ‘मविआ’त फूट! ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार? राऊतांनी काय दिले संकेत?
“कदाचित खिचडीचोर कुठे राहतो, हे पाहण्यासाठी कुणीतरी दुचाकीवरून आले असेल. त्यामुळे गांभीर्यानं घेण्याची गोष्ट नाही. मच्छर मारण्यासाठी कोण-कधी रेकी करत नाही,” असं नितेश राणे यांनी म्हटलं.
– Advertisement –
“संजय राऊत यांचं महाराष्ट्र आणि देशात एवढं महत्त्वं नाही की, त्यांना मारण्यासाठी कोणतरी रेकी वगैरे करेल. राजाराम राऊत यांची दोन्ही मुले स्वत:च्याच कार्यकर्त्यांना उभे करून धमक्या देतात. नंतर बातम्या करत बसतात. या गोष्टीला महत्त्व देण्याची नाही. मच्छर मारहण्यासाठी आम्ही कॉइल लावू… मच्छर जातील आणि संपतील..,” असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहेत.
हेही वाचा : फडणवीसांचा ‘तो’ गौप्यस्फोट अन् संजय राऊत भडकले; म्हणाले,”तुम्ही कोण आहात?”