टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे याने विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 या हंगामात जबरदस्त सुरुवात केली आहे. शिवम दुबे याने मुंबईकडून खेळताना कर्नाटकाविरुद्ध विस्फोटक फलंदाजी केलीय. शिवमने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बी ग्राउंड येथे पहिल्या डावात कर्नाटकाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. शिवमने मैदानात चौफेर फटकेबाजी करत कर्नाटकाच्या गोलंदाजांचा समाचार घेत या हंगामात अप्रतिम सुरुवात केली. शिवमने अर्धशतकी खेळी केली. तसेच कॅप्टन श्रेयस अय्यर याच्यासह पाचव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली.
कर्नाटकाने टॉस जिंकत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अंगकृष रघुवंषी 6, आयुष म्हात्रे 78, हार्दिक तामोरे 84 आणि सूर्यकुमार यादव 20 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे मुंबईची 33.3 ओव्हरमध्ये 4 बाद 234 अशी स्थिती झाली. सूर्या आऊट झाल्यानंतर कॅप्टन श्रेयसची साथ देण्यासाठी शिवम दुबे मैदानात आला. या जोडीने धमाका केला. एका बाजूने श्रेयसने फटकेबाजी केली. तर दुसऱ्या बाजूला शिवम तडाखेबंद बॅटिंग केली आणि अवघ्या 32 बॉलमध्ये 5 चौकार आणि 3 षटकारांसह 51 धावांची खेळी केली. शिवमने एकूण 36 बॉलमध्ये 175 च्या स्ट्राईक रेटने 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 63 धावा केल्या. शिवमने फक्त 10 बॉलमध्ये चौकार आणि षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.
दरम्यान शिवम आणि श्रेयस या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद 148 धावांची भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या या भागीदारीमुळे मुंबईला 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 382 धावांचा डोंगर उभा करता आला.
शिवम दुबेची तडाखेदार खेळी
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), आंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, सूर्यकुमार यादव, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर आणि एम जुनेद खान.
कर्नाटक प्लेइंग ईलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), अनिश केव्ही, निकिन जोस, स्मरण रविचंद्रन, अभिनव मनोहर, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), श्रेयस गोपाळ, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, वासुकी कौशिक आणि विद्याधर पाटील.