रशियाच्या कॅन्सरवरील लसीची किंमत 2.5 लाख रुपये
Marathi December 21, 2024 07:24 PM

कॅन्सरवरील ही लस प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रभावी ठरली आहे. यामुळे टय़ूमरची वाढ मंदावते आणि 80 टक्क्यांपर्यंत घट दिसून येते. ही लस रुग्णांच्या टय़ूमर पेशींच्या डेटावर आधारित तयार केली गेली आहे. रशियाच्या कर्करोगावरील लसीच्या घोषणेनंतर जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आशा निर्माण झाली आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक आंद्रेई कॅप्रिन यांच्या म्हणण्यानुसार, ही रशियन कर्करोगाची लस वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांसाठी वेगळ्या पद्धतीने बनवली जाईल. त्यामुळे त्याची किंमत सुमारे 2.5 लाख रुपये असेल. रशियन नागरिकांना ही लस मोफत मिळणार आहे. मात्र ही लस उर्वरित जगामध्ये कधी उपलब्ध होणार याबाबत कपरिन यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

आंद्रेई कॅप्रिन म्हणाले की, कॅन्सरवरील ही लस प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रभावी ठरली आहे. यामुळे ट्य़ूमरची वाढ मंदावते आणि 80 टक्क्यांपर्यंत घट दिसून येते. ही लस रुग्णांच्या टय़ूमर पेशींच्या डेटावर आधारित तयार केली गेली आहे.

कसे काम करणार
रशियाच्या फेडरल मेडिकल बायोलॉजिकल एजन्सीच्या प्रमुख वेरोनिका स्वोरोत्स्कोवा यांनी मेलेनोमा (त्वचेचा कर्करोग) विरुद्ध लस कसे कार्य करते हे स्पष्ट केले आहे. सर्व प्रथम कर्करोगाच्या रुग्णाकडून कर्करोगाच्या पेशींचा नमुना घेतला जातो. यानंतर शास्त्रज्ञ या टय़ूमरच्या जनुकांची क्रमवारी लावतात. याद्वारे कर्करोगाच्या पेशींमध्ये तयार होणारी प्रथिने ओळखली जातात. प्रथिने ओळखल्यानंतर वैयक्तिक एम-आरएनए लस तयार केली जाते. कर्करोगाची लस शरीराला टी पेशी बनवण्याचा आदेश देते.

कॅन्सरची आणखी एक लस लवकरच
रशियन आरोग्य मंत्रालयाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटरच्या वेबसाइटनुसार, कर्करोगाशी लढण्यासाठी दोन प्रकारचे संशोधन होतंय. यातील पहिली एमआरएनए लस आहे आणि दुसरी ऑन्कोलिटिक व्हायरोथेरपी आहे. ऑन्कोलिटिक व्हायरोथेरपीमध्ये टय़ूमर थेट नष्ट करण्याऐवजी रोगप्रतिकारशक्ती सक्रिय करून कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. या थेरपीसाठी बनवल्या जाणाऱया लसीचे नाव एन्टरोमिक्स आहे. या लसीचे संशोधन पूर्ण झाले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.