परभणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी सोमवारी (ता.२३) परभणी दौऱ्यावर येणार आहेत.
दुपारी एकला ते दिल्लीहून नांदेडला येतील. तेथून दुपारी पावणेतीनला ते येथे दाखल होतील. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतील.
त्यानंतर दुपारी साडेतीनला ते नांदेडमार्गे दिल्लीस रवाना होतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष (प्रशासन व संघटन) नाना गावंडे यांनी दिली.