महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर कुणाला कुठलं खातं मिळणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. अखेरीस 22 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशिरा खातेवाटप जाहीर झालं.
मुख्यमंत्री यांनी गृहमंत्रिपद स्वत:कडेच ठेवलं आहे, तर उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खाते दिले आहे. तसंच, दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्रिपद देण्यात आलंय.
23 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्याच्या आठवड्याभरानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या रुपानं एक अधिवेशन संपल्यानंतर झालं. आता महाराष्ट्रात पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपकडे मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि एकनाथ शिंदे (शिवसेना) हे उपमुख्यमंत्री आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 39 मंत्री असतील. यातील पक्षनिहाय मंत्रिपदं कुणाला मिळाली आणि कुणाला कोणते खाते मिळाले आहे, हे आपण पाहूया.
देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ आणि त्यांची खातीमहायुती सरकारचे तीन प्रमुख नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. यांच्याकडे कोणती खाती असतील, यावरून सत्तेत कोण वरचढ ठरेल, याचा अंदाज ठरणार होता. गृह आणि अर्थ खात्यावरून रस्सीखेच सुरू होती, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे ठेवलं आहे.
इतर खात्यांबाबत सुद्धा काही आश्चर्याचे धक्के पाहायला मिळाले आहेत. विशेषत: पहिल्यांदाच मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची धुरा देण्यात आलीय, तर शिवेंद्रराजे भोसलेंकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा देण्यात आलीय.
कॅबिनेट मंत्री आणि त्यांची खाती :
1) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2) राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
3) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
4) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज
5) गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
7) गणेश नाईक - वन
8) दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9) संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
10) धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12) उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13) जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
14) अदिती तटकरे - महिला व बालविकास
15) शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
16) माणिकराव कोकाटे - कृषी
17) जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
18) नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
19) संजय सावकारे - कापड
20) संजय शिरसाट - सामाजिक न्याय
21) प्रताप सरनाईक - वाहतूक
22) भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन
23) मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
24) नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
25) आकाश फुंडकर - कामगार
26) बाबासाहेब पाटील - सहकार
27) प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
28) पंकजा मुंडे - पशु संवर्धन, पर्यावरण, वातावरण बदल
29) अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास, उर्जा नूतनीकरण
30) अशोक उईके - आदिवासी विकास
31) शंभूराज देसाई - पर्यटन, खाण, व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
32) आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
33) दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ
राज्यमंत्री आणि त्यांची खाती :
1) माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
2) आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
3) मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
4) इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
5) योगेश कदम - गृहराज्य शहर
6) पंकजा भोयर - गृहनिर्माण
Shahid Shaikh/BBC महायुतीला स्पष्ट बहुमतनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला प्रचंड बहुमत (237 जागा) मिळालं. भाजपला 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. तसंच, काही अपक्षांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे.
गेल्या काही दशकांत भाजपप्रमाणे एखाद्या पक्षाला किंवा महायुतीप्रमाणे एखाद्या युतीला पहिल्यांदाच इतके प्रचंड बहुमत मिळाले. त्यामुळे महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, तरीही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होण्यासाठी आठवडा उलटून गेला होता. यासाठी असल्याचं म्हटलं गेलं. मात्र, अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी पार पडला.
या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. दोन आठवडे व्हायला आले आणि हिवाळी अधिवेशन जवळ आलं, तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नव्हता. मात्र, अखेरीस 15 डिसेंबरची तारीख जाहीर झाली आणि मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.