पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतासाठी साधारण होती. ज्यामध्ये खेळाडूंनी एकूण 6 पदके जिंकली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 117 खेळाडूंनी सहभाग नोंदवले होते. ज्यामध्ये भारताच्या खात्यात एकूण 6 पदके आली. ज्यामध्ये भारताने 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक जिंकले. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. मात्र, यावेळी भारताच्या खात्यात एकही सुवर्ण आले नाही. यापूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 1 सुवर्णपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 7 पदके जिंकली होती. जी भारताची एका ऑलिम्पिकमधील सर्वोच्च संख्या होती.
नेमबाजीमध्ये भारताला तीन पदके मिळाले. ज्यात मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेचा समावेश आहे. यासह ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रासाठी पदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला. कोल्हापूरचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. स्वप्नीलच्या कुसाळेच्या या यशानंतर महाराष्ट्र सरकारने त्याला 2 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. स्वप्नीलच्या आधी खाशाबा जाधव यांनी महाराष्ट्राला पहिला कांस्य पदक 1952 मध्ये मिळवून दिला होता.
50 मीटर एअर रायफल या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये (बसून, झोपून आणि आणि उभं राहून) निशाणा लावावा लागतो. स्वप्नीलने 50 मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकूण 451.4 इतका स्कोअर केला. या स्पर्धेत चीनचा लिऊ युकुन अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर 463.6 होता. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने दुसरा क्रमांक पटकावला